Premium

कल्याणमध्ये हाॅटेल मालकावर तलवारीने हल्ला

येथील पूर्व भागातील नांदिवली तर्फ गावा जवळील कशिश हाॅटेलच्या मालकावर दोन इसमांनी धारदार तलवारींनी वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.

Hotel owner attacked with sword in Kalyan
कल्याणमध्ये हाॅटेल मालकावर तलवारीने हल्ला( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

कल्याण- येथील पूर्व भागातील नांदिवली तर्फ गावा जवळील कशिश हाॅटेलच्या मालकावर दोन इसमांनी धारदार तलवारींनी वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. रविवारी मध्यरात्री मलंग गड रस्त्यावरील काकाचा ढाबा भागात ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भीम रामेश्वर सिंग (३६, रा. आमराई, विजयनगर, कल्याण) या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. भीम सिंग हे रविवारी मध्यरात्री हाॅटेल बंद करुन नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरुन कल्याण पूर्वेतील घरी एकटेच चालले होते. मलंगगड रस्त्यावरील काकाच्या ढाब्या जवळ आले असता तेथून रस्त्याने दोन जण हातात धारदार तलवारी घेऊन चालले होते.

हेही वाचा >>>धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया अटक; प्रशांत काॅर्नर कारवाई प्रकरण

भीम यांची दुचाकी पाहताच दोन्ही आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांची स्कुटर अडवून जवळील हत्याराने भीम यांच्या डोक्यावर धारदार तलवारीने वार केले. दोन्ही आरोपींच्या तावडीतून सुटून भीम यांनी तेथून पळ काढला. हल्लेखोरांनी स्कुटरसह घटनास्थळावरुन पळ काढला. स्कुटरच्या कप्प्यात ग्राहक मिळकतीची एक लाखाची रक्कम होती. भीम यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 21:13 IST
Next Story
डोंबिवलीतील रामनगरमधील डाॅमिनोज पिझ्झामध्ये चोरी