scorecardresearch

कल्याणमध्ये महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक; पतीचे युक्रेनमधील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आत्महत्या

युक्रेनमधील एका महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती.

crime
कल्याणमध्ये महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक; पतीचे युक्रेनमधील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आत्महत्या ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

कल्याण – युक्रेनमधील एका महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी तिच्या पतीला कोळसेवाडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. नितीश नायर असे अटक आरोपी पतीचे नाव आहे. तो  कल्याण येथील काटेमानिवली परिसरात राहतो. तो एका शिपिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. काजल असे आत्महत्या केलेल्या महिलेचा नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजलचे वडील सुरेंद्र सावंत यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीश आणि काजल या दोघांचा प्रेमविवाह तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सप्टेंबर महिन्यात काजल हिला माहिती मिळाली की, नितीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. या प्रेमाला  काजल आणि कुटुंबीयांनी विरोध केला होता.

युक्रेनला जाऊ नकोस, असेही तिने सांगितले होते.  ८ नोव्हेंबरला नितीशने तिला सांगितले की, तो काही कामासाठी मुंबई मध्ये बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जात आहे.  त्याऐवजी तो युक्रेनला गेला. त्याने पत्नीला मोबाईलवर लघु संदेश पाठवला की, मी युक्रेनला पोहोचलो असून  मी परत येणार नाही. तू मला विसरून जा,  यामुळे ती नैराश्यात गेली. १० नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे सुरेंद्र यांनी तक्रारीत म्हटले आहे. आत्महत्येपूर्वी तिने काही मैत्रिणींना लघु संदेश पाठवून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.  गुरुवारी तिचा पती नितीश हा मायदेशी परतला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

sikkim flood
Sikkim flood: सिक्कीममध्ये पूरबळी २२ वर, १०३ बेपत्ता; मृतांमध्ये लष्कराचे सात जवान
Boyfriend arrested, case, murdeing girlfriend, suspicion character kalyan
कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या; प्रियकरास अटक
muslim man beaten to death
मंदिरात प्रसाद खाल्ला म्हणून मुस्लीम व्यक्तीला जमावाची मारहाण, उपचारांदरम्यान झाला मृत्यू!
Information about odia scientist dr swati nayak who wins norman borlaug field award
व्यक्तिवेध : डॉ. स्वाती नायक

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Husband arrested in connection with suicide of woman in kalyan amy

First published on: 20-11-2023 at 22:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×