“मी आहे तिथेच आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहे ”, असे स्पष्ट करत शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष भोईर यांनी आपले समर्थन उद्धव ठाकरे यांना जाहीर केले आहे. “अन्य बंडखोरीच्या विषयावर आपणास काहीही बोलायचे नाही. फक्त मी आहे त्याच ठिकाणी आहे ”,’ अशी प्रतिक्रिया माजी आमदार भोईर यांनी दिली.
ठाण्यातील काही नेत्यांना भोईर यांची कामे आणि त्यांचा वाढता दबदबा खूपत होता –
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेला टक्कर देण्यासाठी २०१४ मध्ये शिवसेनेने सुभाष भोईर यांना उतरवून पूर्ण ताकदीने निवडून आणले होते. त्यानंतर भोईर यांनी कल्याण
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.