कल्याण – येथील पश्चिमेतील आधारवाडी तुरुंगाच्या तिन्ही बाजुने दोन वर्षापासून अधिक संख्येने बेकायदा बांधकामे वाढत आहेत. यामुळे तुरुंगाच्या सुरक्षितेतेला धोका निर्माण झाला आहे. ही बेकायदा बांधकामे तोडून टाकावी, अशी मागणी आधारवाडी तुरुंग प्रशासनाकडून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडे दोन वर्षांपासून केली जात आहे. परंतु त्यास पालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते.

आधारवाडी कारागृहाच्या संरक्षित भिंतीपासून बाहेरच्या भागातील १५० मीटरच्या परिसरात कोणत्याही मानवी हालचाली, बांधकामाला परवानगी नाही. १५० मीटरचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र असतो. आधारवाडी कारागृहाच्या मागील बाजुला, तलावाच्या बाजुला, कारागृहाच्या भविष्यातील विस्तारित मोकळ्या जागेमध्ये स्थानिकांनी घरे, दुकाने, आरसीसी पध्दतीची बांधकामे, टपऱ्या, वाहन दुरुस्तीची दुकाने उभारुन तुरुंगाची शासकीय जमीन हडप केली आहे. तुरुंगाच्या मागील बाजुस एक धार्मिक स्थळ बांधण्यात आले आहे. या भागातील दुकाने, निवासी घरे, धर्म स्थळामुळे तुरुंगा सभोवतालचा मानवी वस्तीचा वावर वाढला आहे. माणसांच्या वाढत्या वर्दळीमुळे काही गैरप्रकार या भागात होत आहेत, असे तुरुंग प्रशासनाने पालिकेला कळविले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>> डोंबिवलीत चप्पल विक्रेत्याला बेदम मारहाण

आधारवाडी कारागृहात सुमारे दोन हजाराहून अधिक बंदी आहेत. कारागृहातील सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त असतो. अशाही परिस्थितीत कारागृहालगतच्या बेकायदा बांधकामांमधून काही गैरप्रकार होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुरुंगाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. तुरुंग प्रशासनाने सुरुवातीला बांधकामधारकांना बांधकामे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन या जमिनी आमच्या मालकीच्या आहेत अशी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे पालिका प्रशासनाने तुरुंगाच्या परिसरातील बेकायदा बांधकामांची माहिती घेऊन ती काढून टाकण्यासाठी तुरुंग प्रशासनाला सहकार्य करण्याची मागणी तत्कालीन तुरुंग अधीक्षक ए. एस. सदाफुले यांनी पालिकेला केली होती.

हेही वाचा >>> गंजलेल्या विजेच्या खांबामुळे दुर्घटनेची शक्यता; डोंबिवली एमआयडीसीतील प्रकार

तुरुंग परिसरात बेकायदा बांधकामे केली तरी कारवाई होत नाही. याची जाणीव झाल्याने बांधकामधारक आक्रमकपणे तुरुंग परिसरात बांधकामे करत आहेत. कारागृहाच्या मागील बाजूस तट भिंतीपासून ५० फुटावर झोपडपट्टी वाढत आहे. तुरुंगाला हा मोठा धोक्याचा इशारा आहे. पालिकेने याकामी पुढाकार घेऊन संबंधित बांधकामे तोडून टाकावीत, अशी मागणी तुरुंग प्रशासनाची मागणी आहे. आधारवाडी कारागृहाची एकूण ४० एकर ६६ गुंठे जागा आहे. २४ एकर जागेवर आधारवाडी कारगृह उभे आहे. तुरुंगाच्या भविष्यातील विस्तारासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने आरक्षित जमिनीपैकी १६ एकर ४४ गुंठे जागा हस्तांतरित केली आहे. ४० एकर जमिनीवर कारागृहाचा पसारा आहे. भविष्यात कारागृहाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे कारागृह परिसरातील बेकायदा बांधकामे विस्तारित कामाला अडथळा ठरतील, अशी भीती तुरुंग प्रशासनाने व्यक्त केली आहे.

“ आपण अलीकडेच अतिक्रमण नियंत्रण विभागाचा पदभार घेतला आहे. तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपणाकडे येऊन सविस्तर माहिती दिली तर त्याप्रमाणे आधारवाडी तुरुंगाभोवतीच्या अतिक्रमित बांधकामांवर कारवाईचा विचार केला जाईल.”

प्रसाद बोरकर- उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण विभाग.

Story img Loader