ठाणे : ठाणे तसेच घोडबंदर भागातून जाणाऱ्या मार्गांवर पाणी साचण्याबरोबरच खड्डे पडल्याने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होऊ लागली असतानाच, या महामार्गांलगत असलेल्या सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जात असल्याने कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे. या कोंडीमुळे नागरिकांमधून पालिका तसेच पोलिस प्रशासनावर टिकेची झोड उठू लागली असून या टिकेनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी शहरातील सेवा रस्त्यांवरील बेकायदा पार्किंग हटविण्याचे आदेश संबंधित सहायक आयुक्तांना दिले आहेत. या कारवाईबरोबरच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर खड्डे पडले आहेत. शहरातील बाळकुम चौक, मल्हार चौक तसेच इतर भागातील अंतर्गत मार्गांवर खड्डे पडले आहेत. सखल भागातील काही रस्त्यांवर पाणी साचत आहेत. साचलेले पाणी आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे शहरातील महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. १५ ते २० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी एक ते दिड तासांचा अवधी लागत आहे. या कोंडीत नोकरदार वर्गासह विद्यार्थी अडकून पडत असून त्यांचे कोंडीमुळे प्रचंड हाल होत आहेत. महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी अनेक जण ठाणे आणि घोडबंदर भागातील सेवा रस्त्याने प्रवास करू लागले आहेत. मात्र, या मार्गांलगत गॅरेज, जुनी व नवीन वाहन खरेदीच्या कार्यालयातील वाहने, दुकानदारांसह इतर कार्यालयातील वाहने सेवा रस्त्यांवर बेकायदा उभी केली जात आहेत. सेवा रस्त्यांच्या दोन्ही बाजुला चारचाकी आणि दुचाकी उभ्या केल्या जात असून यामुळे वाहतूकीसाठी पुरेसा रस्ता शिल्लक राहत नाही. या निमुळत्या मार्गामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. त्यामुळे महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी सेवा रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना बेकायदा वाहन पार्किंगचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. या कोंडीमुळे नागरिकांमधून पालिका तसेच पोलिस प्रशासनावर टिकेची झोड उठू लागली आहे. या टिकेनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी शहरातील सेवा रस्त्यांवरील बेकायदा पार्किंग हटविण्याचे आदेश संबंधित सहायक आयुक्तांना दिले आहेत. या कारवाईबरोबरच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

ठाणे तसेच घोडबंदर भागातील सेवा रस्त्यालगत असलेल्या उभी केलेली जाणारी बेकायदा वाहने हटविण्याचे आदेश संबंधित सहायक आयुक्तांना दिले आहेत. जेणेकरून नागरिकांना वाहतूुकीसाठी सेवा रस्ते उपलब्ध होऊन त्यांची कोंडीतून काही प्रमाणात सुटका होईल. तसेच रस्त्यावर वाहने उभी करू नका अशा सुचना संबंधित दुकानदार, गॅरेजवाल्यांना देण्यास सांगितले आहे. त्यानंतरही वाहने उभी केली जात असतील तर त्यांच्यावर कारवाई करा अशाही सुचना दिल्या आहेत.

संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका