ठाणे : कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंची साठवणूक करून त्यावर नव्याने स्टीकर चिटकवून त्याची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी १ कोटी २५ लाख ८६ हजार २६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा : एसटी अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड, संपाचा परिणाम प्रवाशांच्या पथ्यावर
कंपनीचा व्यवस्थापक जतीन शर्मा (२५) आणि सुरेश विश्वकर्मा (५२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. भिवंडी येथील ओवळी गावाजवळील सागर काॅम्प्लेक्समधील एका गोदामात कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंची विक्री केली जात असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकांनी गोदामाची पाहणी केली असता, या गोदामात कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. तसेच या कालबाह्य वस्तूंवर नव्याने मुदत असलेले स्टीकर चिटविण्यात आले होते. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात जतीन शर्मा, सुरेश विश्वकर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.