Premium

डोंबिवलीत मद्यपी वडिलांकडून अल्पवयीन मतिमंद मुलीची हत्या

या मतिमंद मुलीचा काही उपयोग नाही. तिला मारावेच अशी भाषा ते करत होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

mentally retarded minor girl, mentally retarded minor girl killed by father, dombivli crime news, alcoholic father killed his minor girl
डोंबिवलीत मद्यपी वडिलांकडून अल्पवयीन मतिमंद मुलीची हत्या (संग्रहित छायाचित्र)

डोंबिवली : डोंबिवली जवळील मानपाडा गावात रविवारी संध्याकाळी एका मद्यपी वडिलाने राहत्या घरात १० वर्षाच्या मतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. या प्रकारानंतर पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन आरोपीने मुलगी मयत झाल्याची माहिती दिली. तेथून तो फरार झाला. मयत मुलीची आई लिलावती अग्रहरी हिच्या तक्रारीवरुन पती मनोज अग्रहरी (३५) याच्याविरुध्द मानपाडा पोलिसांनी खुनाचा गु्न्हा दाखल केला आहे. तक्रारदार लिलावती यांना तीन मुली आहेत. एक मुलगी मतिमंद आहे. दोन मुली मजुरीची कामे करतात. या मुलींचे वडील मनोज मद्यपी आहेत. डोंबिवलीत एका किरणा दुकानात ते कामगार म्हणून काम करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मद्यपान करुन आल्यावर ते नेहमी पत्नी, दोन मुलींसह मतिमंद मुलीला मारहाण करायचे. या मतिमंद मुलीचा काही उपयोग नाही. तिला मारावेच अशी भाषा ते करत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. इतर दोन मुलींसह पत्नीचाही गळा दाबून ते तिला मारण्याचा प्रयत्न करायचे. मतिमंद मुलीच्या संगोपनाकडे आईचे पूर्ण लक्ष होते. दुपारच्या वेळेत मुलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे म्हणून ती कामावरुन काही वेळेसाठी घरी यायची आणि पुन्हा कामावर जात होती. रविवारी संध्याकाळी मनोज अग्रहरी घरी मद्यपान करून आला.

हेही वाचा : गणपती विसर्जन भाविकांना पाहता यावे यासाठी ग्रामस्थांकडून खारफुटीची कत्तल, डोंबिवलीत देवीचापाडा खाडी किनारचा प्रकार

त्याने दारुच्या नशेत मतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. शेजाऱ्यांच्याना हा प्रकार समजला. मनोज पत्नी काम करत असलेल्या एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी गेला. तेथील कर्मचाऱ्यांना पत्नी लिलावती हिला तातडीने घरी जाण्यास सांगा. मतिमंद मुलगी मयत झाली आहे, असा निरोप दिला. तेथून मनोज पळून गेला. कर्मचाऱ्यांनी मुलीची आई लिलावतीला घडला प्रकार सांगितला. तातडीने ती घरी आली. तेव्हा मुलगी बिछान्यावर निपचित पडली होती. पती मनोजनेच मतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करुन लिलावतीने पती मनोज अग्रहरी विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dombivli 10 year old mentally retarded girl killed by alcoholic father css

First published on: 25-09-2023 at 11:56 IST
Next Story
गणपती विसर्जन भाविकांना पाहता यावे यासाठी ग्रामस्थांकडून खारफुटीची कत्तल, डोंबिवलीत देवीचापाडा खाडी किनारचा प्रकार