scorecardresearch

Premium

डोंबिवलीत गुरचरण जमिनीवरील बेकायदा इमारतीमधील घर खरेदीत १२ जणांची फसवणूक; बँकेसह खरेदीदारांना दोन कोटी ३६ लाखाचा चुना

दोन वर्षाच्या कालावधीत दोन कोटी ३६ लाख ९० हजार ३२५ रुपयांची फसवणूक करणाऱ्या १३ भूमाफियांच्या विरुध्द फसवणूक झालेल्या १२ घर खरेदीदारांच्या तक्रारी वरुन टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Dombivli, illegal buildings, construction, flat, cheating
डोंबिवलीत गुरचरण जमिनीवरील बेकायदा इमारतीमधील घर खरेदीत १२ जणांची फसवणूक (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेचे फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त, महसूल विभागातील मंडल अधिकारी, तलाठी यांच्या आशीर्वादाने दोन वर्षापूर्वी ठाकुर्ली जवळील कांचनगाव (खंबाळपाडा) मधील गुरचरण जमिनीवर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली. ही इमारत खासगी जमिनीवर, पालिका, महसूल विभागाच्या आवश्यक परवानग्या घेऊन अधिकृतपणे उभारली आहे. असे घर खरेदीदार, बँक अधिकाऱ्यांना सांगून त्यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन वर्षाच्या कालावधीत दोन कोटी ३६ लाख ९० हजार ३२५ रुपयांची फसवणूक करणाऱ्या १३ भूमाफियांच्या विरुध्द फसवणूक झालेल्या १२ घर खरेदीदारांच्या तक्रारी वरुन टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Gotegaon Fire
Goregaon Building Fire : मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदत जाहीर, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
surprise inspection
पुणे : ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षाची आता होणार अचानक तपासणी; पोलीस आयुक्तांचे आदेश
property tax arrears
पिंपरी : महापालिकेच्या ४१ हजार मालमत्ताकर थकबाकीदारांना नोटिसा, होणार ‘ही’ कारवाई
delhi jangpura showroom robbery
१०० रुपयांची हातोडी, १३०० चं डिश कटर घेतलं अन् दागिन्यांचं शोरूम लुटलं, २५ कोटींच्या चोरीचं गूढ उकललं

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कोणत्याही इमारतीत घरे खरेदी करण्यापूर्वी नागरिकांनी पालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम कागदपत्रांची खात्री करावी, असे आवाहन पालिकेतर्फे वारंवार करुनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याचा फटका घर खरेदी फसवणुकीत होत आहे. ठाकुर्ली पूर्व भागातील कांचनगाव खंबाळपाडा येथील गुरचरण जमिनीवर मे. कृष्णा कन्स्ट्रक्शन या कंपनीने कृष्णा व्हिला ही बेकायदा इमारत दोन वर्षाच्या कालावधीत उभारली. हवेशीर, मोकळी जागा त्यामुळे नागरिकांनी या इमारतीत इमारत बांधकाम कागदपत्रांची पडताळणी न करता २५ लाखापासून पुढील किमतील या बेकायदा इमारतीत घरे खरेदी केली. यासाठी बँकांकडून गृहकर्ज घेतले. विकासकाने घरे विकताना या इमारतीत ज्या सुविधा देण्याचे आश्वासन खरेदीदारांना दिले होते. ते पाळले नाही.

हेही वाचा…. दिवा-वसई दोन रेल्वे पॅसेंजर सकाळच्या वेळेत सोडण्याची प्रवाशांची मागणी; खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना ७०० प्रवाशांचे निवेदन

कृष्णा व्हिला इमारती मधील १२ घर खरेदीदारांनी इमारतीची जमीन मालकी, पालिकेची बांधकाम मंजुरी कागदपत्रे, अकृषिक कागदपत्रे यांची अलीकडे विविध कार्यालयांमध्ये चौकशी केली. त्यांना ती सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गुरचरण जमीन असताना ती आपल्या खासगी मालकीची असल्याचे रखमाबाई काळण, चंद्राबाई काळण, दत्ता काळण, बाळा काळण, संगीता काळण यांनी खरेदीदारांना खोटे सांगून बनावट साताबारा उतारे तयार केले. या जमिनीवर इमारत उभारणीसाठी मे. कृष्णा कन्स्ट्रक्शनचे शोभाराम चौधरी यांच्या बरोबर कुलमुखत्यार केले, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा…. कल्याणमध्ये पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांना बेदम मारहाण

इमारत बांधून घर खरेदीदारांनी फसवणूक करणाऱ्या १३ माफियांच्या विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात खरेदीदार तानाजी बबन जाधव आणि इतर ११ यांनी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पालिकेच्या फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त, मंडळ अधिकारी, तलाठी या महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा बेकायदा गृहप्रकल्प उभा राहिला आहे. काही वाद्ग्रस्त निवृत्त पालिका अधिकाऱ्यांचा या भागातील बेकायदा बांधकामांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

गुन्हे दाखल भूमाफिया

मे. कृष्णा कन्स्ट्रक्शन (रा. ठाकुर्ली), शोभाराम चेनाजी चौधरी (शिव भोळे सोसायटी, पाथर्ली), सखाराम घिसारामजी चौधरी (रा.रिध्दी सिध्दी पार्क, चोळे, ठाकुर्ली), विपुल दलाराम चौधरी (रा. वक्रतुंड सोसायटी, खारीगाव, कळवा), विनोद विपुल चौधरी, शेषाराम उर्फ संजय घिसारामजी चौधरी, शारदा शेषाराम चौधरी, अश्विनी खरात, रखमाबाई काळण चंद्राबाई काळण, दत्ता सुकऱ्या काळण, बाळा सुकऱ्या काळण, संगीता सुनील काळण (सर्व राहणार कांचनगाव).

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dombivli 12 people cheated by selling homes from illegal buildings dvr

First published on: 11-04-2023 at 17:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×