डोंबिवली – डोंबिवलीत प्रवासी म्हणून रिक्षेत बसलेल्या एका प्रवाशाने हातचलाखी करून एका ६५ वर्षाच्या रिक्षा चालकाला लुटले. रिक्षा चालकाकडील ६० हजार रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज चतुर प्रवाशाने काढून घेऊन पळ काढला. मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शिळफाटा रस्त्यावरील पिसवली गाव कमानीजवळ हा प्रकार घडला.

रिक्षा चालक हनुमंत इदाते यांनी या फसवणूक प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. रिक्षा चालक इदाते हे मोठागाव भागात राहतात. रिक्षा चालक हनुमंत इदाते यांना संपर्क केल्यावर त्यांनीही घडलेल्या प्रकाराची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>कसारा लोकलमधील प्रवाशावरील हल्ल्यातील आरोपीचा जामीन कल्याण न्यायालयाने फेटाळला

पोलीस ठाण्यातील तक्रार आणि चालक इदाते यांची माहिती अशी की, मंगळवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानक येथून एका प्रवाशाने रिक्षा चालक हनुमंत इदाते यांना आपणास पिसवली गाव येथे जायचे आहे. तेथे काही वेळ थांबून आपणास परत यायचे आहे असे सांगितले. ठरल्या भाड्याप्रमाणे चालक इदाते प्रवाशाला घेऊन पिसवली गाव येथे गेले. पिसवली कमान येथील शिवसेना शाखेच्या समोर त्यांनी प्रवाशाला सोडले. तेथे रस्त्याच्या बाजुला चालक इदाते आणि प्रवासी उभे होते. तेथे प्रवाशाने चालक इदाते यांना बोलण्यात गुंतवले. त्यावेळी काहीतरी हातचलाखी करून प्रवाशाने रिक्षा चालक इदाते यांना भुरळ घातली. त्यामुळे सुरुवातीचे पंधरा मिनीट प्रवाशाने केलेल्या सुचनेप्रमाणे चालक इदाते यांनी आपल्या बोटातील अंगठी, गळ्यातील सोनसाखळी काढून दिली. सोन्याचा ऐवज ताब्यात मिळताच प्रवाशाने तेथून पळ काढला. हा प्रकार समोर घडत असताना काही क्षण इदाते यांना काय घडले आहे हे समजले नाही.

हेही वाचा >>>डोंबिवलीत माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे-महेश गायकवाड यांची भेट; विकास कामे, नागरी समस्यांवर चर्चा केल्याचा दावा

पंधरा मिनिटानंतर हनुमंत इदाते भानावर आले. त्यावेळी त्यांना आपल्याजवळील सोन्याचा ऐवज गायब असल्याचे दिसले. आपल्या रिक्षेतील प्रवाशानेच तो भुरळ घालून काढून नेला असा दाट संशय व्यक्त करून इदाते यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. घडल्या प्रकारच्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण इदाते यांनी पाहिले. त्यावेळी संबंधित इसम इदाते यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील सोन्याचा ऐवज घेत असल्याचे दिसून येत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाऊलबुध्दे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader