scorecardresearch

Premium

निरोगी राहण्यासाठी योगसाधना प्रभावी उपचार पध्दती, डोंबिवलीतील परिसंवादात तज्ज्ञ डाॅक्टरांची मते

योग योग्यपद्धतीने केले नाही तर ते आरोग्याला हानीकारक आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शक गुरूंकडून योगाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यानंतर योग साधना केली पाहिजे.

dombivli brahmin sabha, importance of yoga, yoga for healthy life, doctors told the importance of yoga
योगोपचार परिसंवादात डाॅक्टर उल्का नातू, डाॅक्टर नितीन पाटणकर यांच्याशी संवाद साधताना डाॅक्टर उल्हास कोल्हटकर. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

डोंबिवली : मन शांत व संयमित ठेवण्यासाठी, दु:ख नाहीसे करण्यासाठी आणि शरीर सदृढ, निरोगी राहण्यासाठी योग साधना प्रभावी उपचार पध्दती आहे. योग ही आपली उद्याची प्रभावी संस्कृती असणार आहे, अशी मते ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डाॅ. नितीन पाटणकर, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅक्टर उल्का नातू यांनी ब्राह्मण सभेतर्फे आयोजित योगोपचार परिसंवादात बोलताना व्यक्त केली.

ब्राह्मण सभा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डाॅक्टर उल्हास कोल्हटकर यांनी ठाणे येथील डाॅक्टर पाटणकर, डाॅक्टर नातू यांच्याशी संवाद साधला. योग म्हणजे काय, त्याचा उपयोग काय आणि योग करताना घ्यावयाची काळजी, त्याचा आरोग्याच्या दृष्टीने उपयोग काय आणि त्याच्या मर्यादा कोणत्या आणि येत्या काळात योगाचे महत्व काय असणार आहे, अशा अनेक विषयांवर डाॅक्टर पाटणकर, डाॅक्टर नातू यांनी आपली मते व्यक्त केली.

cbse open book exam plan
विश्लेषण : सीबीएसईकडून प्रायोगिक तत्वावर ‘ओपन बुक परीक्षा’ घेण्याचा निर्णय, ही संकल्पना नेमकी काय? वाचा सविस्तर…
scholarship fellowship importance of leadership skills in higher education
स्कॉलरशीप फेलोशीप : उच्च शिक्षणाच्या प्रवासातील नेतृत्व कौशल्याचे महत्त्व
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : बुद्धिमत्ता चाचणी तयारी
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : अनुदानसुद्धा अनुत्पादक गुंतवणूक!

हेही वाचा : ठाणे : टोल दरवाढीविरोधात मनसेचे उपोषण सुरूच, उपोषणाचा तिसरा दिवस

योग केल्यानंतर शरीरातील विविध प्रकारच्या व्याधी दूर होतात. ही परिणामकारता दिसण्यासाठी काही अवधी जातो. शरीर सुदृढतेसाठी योग ही एक चांगली उपचार पध्दती आहे. या उपचार पध्दतीने शरीरातील अनेक व्याधी दूर होऊ शकतात, याचा अनुभव आता नागरिक घेऊ लागले आहेत. त्यामुळे ही उपचार पध्दती आता जागतिक होऊ लागली आहे. योग योग्यपद्धतीने केले नाही तर ते आरोग्याला हानीकारक आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शक गुरूंकडून योगाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यानंतर योग साधना केली पाहिजे. कुणीही अलीकडे योगतज्ज्ञ होऊन मार्गदर्शन करतो. हे गैरप्रकार रोखण्यासाठी योगाचे स्थान निश्चित ठेवण्यासाठी योग साधनेचे प्रमाणिकरण होणे आवश्यक आहे, असे डाॅक्टर पाटणकर यांनी सांगितले.

हेही वाचा : बदलापूर: पालिका मुख्यालयाबाहेरच खड्ड्यांची आरास

मनशांती आणि दु:ख नाहीसे करण्यासाठी योग साधनाही प्रभावी उपचार पध्दती आहे. योग केले म्हणजे सगळे आजार बरे होतील असे नाही. तर ती साधना समर्पित भावाने मनात उतरणे खूप महत्वाचे आहे. योग केले आणि साधना आचरणात आणली नाही तर केलेल्या योग कृतीचा लाभ होणार नाही. दैनंदिन जीवनात योग साधना खूप महत्वाची आहे. डाॅक्टरांनी पण आता योग शिकणे आवश्यक आहे. योग शिकविणारा गुरू सक्षम असणे आवश्यक आहे, असे डाॅ. नातू यांनी सांगितले. काही तत्व, धोरण ठरवले तर योगाचे प्रमाणिकरण शक्य आहे. अन्यथा हे काम कठीण आहे, असे डाॅक्टर नातू यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : ठाण्यात रुंद रस्ते पार्किंगसाठी आंदण? रुंदीकरणानंतरही कोंडी कायम

योग ही उद्याची संस्कृती असल्याने प्रत्येक डाॅक्टरने आता योग शिकणे गरेजेच आहे, अशी मते परिसंवादातील दोन्ही डाॅक्टरांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्राम परांजपे यांनी केले. यावेळी ब्राह्मण सभेचे पदाधिकारी डाॅक्टर, प्राध्यापक विनय भोळे आणि इतर उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dombivli brahmin sabha doctors told the importance of yoga for healthy life css

First published on: 07-10-2023 at 12:32 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×