scorecardresearch

डोंबिवली : ठाकुर्ली पुलाच्या पोहच रस्त्यावर राडारोड्याचे ढीग

हे ढीग पालिकेकडून उचलले जात नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

heaps of debris in dombivli, heaps of debris on thakurli bridge
ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ राडारोड्याचे ढीग. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

डोंबिवली : येथील ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या पूर्व भागात पोहच रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून राडारोड्याचे ढीग पडले आहेत. हे ढीग पालिकेकडून उचलले जात नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आणि स. वा. जोशी शाळेसमोरील भागात हा राडारोडा पडला असून तो उचलण्याची मागणी केली जात आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कल्याण डोंंबिवली पालिकेने धूळ नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गृहप्रकल्पांच्या ठिकाणी विकासकांना धूळ नियंत्रणासाठी यंत्रणा उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकुर्ली येथील उड्डाण पुलाच्या कोपऱ्यावर स. वा.जोशी शाळेच्या प्रवेशव्दारावर अनेक दिवसांपासून राडारोडा पडला आहे. तो पालिका अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असे प्रश्न नागरिक करत आहेत.

Guthli Milind Bhagat
वर्धा : अखेर ‘गुठली’ स्थानबद्ध, नागपूरच्या कारागृहात रवानगी
murder crime
सिंहगड रस्त्यावर उपाहारगृहचालकाचा खून; वैमनस्यातून खून झाल्याचा संशय
sheep killed wolf attack
सांगली : लांडग्यांच्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार, २० गायब
Husband commits suicide
“तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

हेही वाचा : टीएमटीला जाहिरातींमधून मिळणार १२ कोटीचा महसुल; आठ वर्षानंतर निविदेला ठेकेदारांचा प्रतिसाद

या राडारोड्याने रस्त्याचा पाच ते सहा फुटाचा भाग व्यापला आहे. स. वा. जोशी शाळेत आपल्या मुलांना दुचाकी, चारचाकीवरून सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना राडारोड्याच्या ढिगामुळे तेथे वाहने उभी करणे शक्य होत नाही. वाहनांना वळण घेऊन पुलावरील मार्गिकेत जावे लागते. संध्याकाळच्या वेळेत वारा सुटला की राडारोड्याची धूळ परिसरात पसरते. शाळेच्या आवारात खेळणाऱ्या मुलांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो, अशा तक्रारी आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dombivli heaps of debris on the approach road to thakurli bridge css

First published on: 20-11-2023 at 17:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×