डोबिवली: डोंबिवली जवळील मानपाडा येथील शिळफाटा रस्त्यावरील रुणवाल गार्डन गृहसंकुलात रविवारी रात्री आईने आपल्या चिमुकलीच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली. या प्रकारानंतर स्वताने आत्महत्या करून जीवन संपवले. या महिलेचा पती रात्री घरी आला. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पूजा सकपाळ आहे. तर अडीच वर्षाच्या चिमुकलीचे नाव समृध्दी आहे. राहुल सकपाळ, पूजा आणि समृध्दी असे त्रिकोणी कुटुंब रुणवाल गार्डन गृहसंकुलात राहत होते. चार वर्षापूर्वी राहुल आणि पूजाचा विवाह झाला होता. त्यांना अडीच वर्षाची समृध्दी मुलगी होती. आनंदाने या कुटुंबाचा संसार सुरू होता.

हेही वाचा : डोंबिवलीतील शिंदे गटातील युवा नेत्याला इशारा, बंडखोरांकडे दुर्लक्ष करून महायुतीचे काम जोमाने करा, श्रीकांत शिंदे यांचा सल्ला

रविवारी काही कामानिमित्त पती राहुल सकपाळ बाहेर गेले होते. कामे उरकून ते रात्री आठ वाजताच्या दरम्यान घरी आले. त्यावेळी त्यांना धक्का बसला. बिछान्यावर चिमुकली पडली होती. तर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार तातडीने पती राहुल यांनी मानपाडा पोलिसांना कळविला. रुणवाल गार्डन वसाहतीमधील रहिवासी जमा झाले.

हेही वाचा : अंध दाम्पत्याचे बाळ परस्पर दत्तक ! प्रसूतीनंतर अंध महिलेला स्तनपान बंद करण्याच्या दिल्या गोळ्या

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविले. राहुल, पूजा यांचा सुखा संसार सुरूअसताना हा प्रकार का घडला. या आत्महत्या, हत्येमागचे कारण आहे. मानसिक, आर्थिक कारणातून पूजाने हा प्रकार केला का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Story img Loader