scorecardresearch

Premium

डोंबिवलीत कामगाराच्या मृत्युप्रकरणी विद्युत, रंगारी ठेकेदारांवर गुन्हे

या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून कोणीही तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आला नाही.

dombivli police, dombivli worker death, dombivli police registered case on contractors
डोंबिवलीत कामगाराच्या मृत्युप्रकरणी विद्युत, रंगारी ठेकेदारांवर गुन्हे (संग्रहित छायाचित्र)

डोंबिवली : एका विकासकाच्या गृहप्रकल्पावर काम करणाऱ्या एका कष्टकरी कामगाराचा सोमवारी सकाळी अकस्मात मृत्यू झाला होता. या कामगाराच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करुन मानपाडा पोलिसांनी या बांधकामाच्या ठिकाणी कामगार पुरवठा करणारा विद्युत ठेकेदार आणि रंगारी ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला. विद्युत ठेकेदार आणि रंगारी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला.

या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून कोणीही तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आला नाही. त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद ढाकणे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. विद्युत ठेकेदार मोहन नायडू, रंगारी ठेकेदार मेहबुब अब्दुल रशीद हुसेन अशी गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारांची नावे आहेत.

High court observation separate living of married couple
पत्नीने पतीच्या नोकरीच्या शहरात वास्तव्याचा आग्रह धरणे क्रुरता नाही
janhavi kandula
जान्हवी कंडुलाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई
death
कार पार्कींगचा वाद; पोलीस कर्मचाऱ्याच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
vasai rape case
वसई: चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार; संतप्त पालकांनी स्वयंपाक्याला शाळेतच चोपले

हेही वाचा : पावसाच्या धारात घामाच्याही धारा! ऊन पावसाचा लपंडाव, गणेशभक्तांची तारांबळ

पोलिसांनी सांगितले, मयत कामगार हा डोंबिवलीतील डावखर इन्फ्रास्ट्रक्चर या विकासकाच्या बांधकाम प्रकल्पावर काम करत होता. बांधकामाच्या ठिकाणी काम करताना विद्युत, रंगारी ठेकेदार यांनी सुरक्षेची सर्व साधने संबंधित मयत कामगाराला देऊन मगच त्याला बांधकामाच्या ठिकाणी काम करण्यास सांगणे आवश्यक होते. तशी कोणतीही साधने न पुरवता कष्टकरी कामगार काम करत होता.

हेही वाचा : कल्याणमध्ये ओळखीच्या इसमाकडून व्यावसायिकाची फसवणूक

हे काम करत असताना त्याचा अकस्मिक मृत्यू झाला. या मयत कामगाराच्या नातेवाईकांचा मानपाडा पोलिसांनी शोध घेतला. ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यामुळे मानपाडा पोलिसांनी सरकारपक्षातर्फे स्वताहून हा गुन्हा दाखल करुन घेतला. मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dombivli police case registered on 2 contractors for death of worker at construction site css

First published on: 21-09-2023 at 14:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×