कल्याण : कल्याणमधील माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ शिवसैनिक अरविंद पोटे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल मानपाडा पोलिसांनी कल्याण मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांना पोलीस ठाण्यात तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे शिवसैनिक अरविंद पोटे सपत्निक काही कामानिमित्त डोंबिवली एमआयडीसीत विको नाका भागात आले होते. त्यावेळी बाळ हरदास यांनी अरविंद यांच्या मोबाईलवर व्हॉट्सपवर संपर्क करून त्यांना राजकारणातून तु्म्ही राजकारण सोडून राजकीय संन्यास घ्यायचा. दोन दिवसात कल्याण सोडून जायचे, अन्यथा तुम्हाला संपून टाकीन, असे सांगून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा…डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचा प्रवाशांना फटका

मागील ४० वर्षांपासून हरदास आणि पोटे एकत्रितपणे शिवसेनेत काम करत आहेत. गेल्या दहा दिवसापूर्वी अरविंद पोटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या विषयावरून हरदास आणि पोटे यांच्यात धुसफूस सुरू होती. तर हरदास यांनी आपण पक्ष सोडून गेलेल्यांना आस्थेने पक्ष सोडून जाण्याचे कारण विचारतो. त्यांची चौकशी करतो म्हणून आपण ठाकरे गट सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या शिवसैनिकांना संपर्क करतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.

गेल्या वर्षापासून बाळ हरदास हे पत्रक, समाज माध्यमातून मख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर खरपूस टीका करत आहेत. व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते शिंदे गटाला लक्ष्य करत आहेत. हरदास यांनी दोन महिन्यापूर्वी एक युट्युब वाहिनी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. हरदास हे कल्याण डोंबिवली पालिकेतील साडे सहा हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतात. कल्याणमधील मुस्लिम बहुल प्रभागातून ते यापूर्वी पालिकेत निवडून आले आहेत. निवडणुकीत आपला उपद्रव होण्याची शक्यता विचारात घेऊन शिंदे गटाने आपल्यावर ही कारवाई केल्याचा हरदास यांचा आरोप आहे.

हेही वाचा…मोदींच्या नेतृत्वाखाली देश हुकूमशाहीकडे ! कल्याणच्या सभेत शरद पवारांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी कल्याणमध्ये जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळ हरदास यांनी समाज माध्यमातून राजकीय संदेश टाकून कोणतीही गडबड करू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही हरदास यांना नोटीस दिली जाऊ शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये, कायदे अभ्यासकांमध्ये सुरू आहे.

हेही वाचा…ठाणे जिल्ह्यात परराज्यातून येणारे लोंढे आवरा – राज ठाकरे

अरविंद पोटे यांना दिलेल्या धमकी आणि केलेल्या गुन्ह्याविषयीच्या कागदपत्रांसह हरदास यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर यांनी दिले आहेत. कागदपत्रांसह हजर न राहिल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी बाळ हरदास यांना दिला आहे.

Story img Loader