कल्याण: कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी १० मे रोजी कल्याणमध्ये येत आहेत. कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानावर मोदींची प्रचाराची सभा होणार आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा कल्याणमध्ये येत आहेत. यापूर्वी देशाचा एकही पंतप्रधान कल्याणमध्ये फिरकला नव्हता. २०१४ मध्ये मोदी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कल्याणमध्ये आले होते. १८ डिसेंबर २०१८ मध्ये मोदी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने आयोजित मेट्रो मार्ग प्रकल्पांसह सिडको गृहनिर्माण प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी कल्याणमधील फडके मैदानावर आले होते. यावेळी मोदींनी २१ मिनिटे भाषण केले होते. आता तिसऱ्यांदा मोदी कल्याणमध्ये येत आहेत.

Pk mishra with pm modi
पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी प्रधान सचिव पदावर कायम; कोण आहेत पी. के. मिश्रा?
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates in Marathi
Video: इथे पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण!
Raksha Khadse, Raksha Khadse Union Minister, Raksha Khadse Union Minister in Modi s Cabinet, Raksha khadse political journey, raver lok sabha seat, Raksha Khadse Sarpanch to Union Minister, Eknath khadse,
ओळख नवीन खासदारांची : रक्षा खडसे, सरपंचपदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत झेप
Mahayuti base remains Analysis by Devendra Fadnavis
महायुतीचा जनाधार कायम! देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण, उद्धव यांना सहानुभूती नसल्याचा दावा
Chief Minister Eknath Shinde candid speech Shrikant Shinde is responsible for party organization
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती; श्रीकांत शिंदेंकडे पक्ष संघटनेची जबाबदारी
tai kannamwar, Pratibha Dhanorkar, Pratibha Dhanorkar Becomes Chandrapur s Second Woman MP, chandrapur lok sabha seat, After Six Decades
चंद्रपूर : ताई कन्नमवार यांच्यानंतर सहा दशकानंतर प्रतिभा धानोरकर ठरल्या दुसऱ्या महिला खासदार
Argument between Kapil Patil and Kisan Kathore after a meeting at Shivle in Murbad
चार जून नंतर काहींचा करेक्ट कार्यक्रम; मतदानानंतर पाटील-कथोरे वाद पेटला
Sambit Patra BJP Puri Lok Sabha elections Lord Jagannath is PM Modi bhakt
“भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त” या वक्तव्याचा संबित पात्रा यांना पुरी मतदारसंघात फटका बसेल का?

हेही वाचा : एम. के. मढवी यांच्याविरोधातील तक्रारदार भाजपचा पदाधिकारी ?

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय मंत्री कपील पाटील निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, जिजाऊ विकास पक्षातर्फे नीलेश सांबरे निवडणूक लढवित आहेत. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत कपील पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड, शहापूर, भिवंडी ग्रामीण, पू्व, पश्चिम आणि कल्याण पश्चिम अत्यावश्यक विकास कामे मार्गी लावण्यात पुढाकार घेतला नाही. या भागातील लोकांच्या नागरी समस्या, किंंवा जनसंपर्क ठेवण्यात कमी पडले. त्याची किंमत आता कपील पाटील यांना प्रचाराच्यावेळी चुकती करावी लागत आहे. बाळ्या मामा, नीलेश सांबरे असे तगडे उमेदवार समोर असल्याने यावेळी कपील पाटील यांच्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोदी यांच्या सभेचे कल्याणमध्ये आयोजन करण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा : कल्याण: टिटवाळा जवळील म्हस्कळ गावातील श्री शंकर महाराज मंदिरात चोरी

कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवित आहेत. उच्चशिक्षित उमेदवार म्हणून खासदार शिंदे यांच्या ख्याती आहे. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत अडीच हजाराहून अधिक कोटीचा निधी खासदार शिंदे यांनी विकास कामांसाठी कल्याण लोकसभा मतदारसंंघासाठी आणला.या भागात काँक्रीट रस्ते, नागरिकांचे अत्यावश्यक प्रकल्प मार्गी लावण्यात महत्वाची भूमिका बजावली. कल्याण-तळोजा, उल्हासनगर, बदलापूर मेट्रो मार्गी लावण्यात डाॅ. शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. विकास कामांचा खासदार शिंदे यांनी पाऊस पाडला असला तरी या भागातील एक वर्ग खासदार शिंंदे यांच्या कार्यपध्दतीवर थोडा नाराज आहे. या नाराजांना सांभाळून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांंनी प्रचाराचा धडाका उडविला आहे.

हेही वाचा : कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह ७ माजी नगरसेवक शिवसेनेत

आमदार गणपत गायकवाड यांचा कल्याण पूर्व मतदारसंघ, २७ गाव, १४ गाव ते अंबरनाथ ग्रामीण खासदार समर्थकांंनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. या भागात मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील प्रचारासाठी फिरत आहेत. कल्याण आणि भिवंंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांविषयी काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे. कल्याण लोकसभेत ठाकरे गटातून वैशाली दरेकर या मुख्यमंत्री पुत्र उमेदवारा विरुध्द लढत देत आहेत.