scorecardresearch

Premium

कल्याणमध्ये व्हाॅट्सअ‍ॅप स्टेटसवरील धारदार सुरे तरुणाला पडले महाग

प्रदीप यादव (२५) असे या तरुणाचे नाव आहे.

kalyan youth shared video carrying four sharp knives social media
धारदार सुऱ्यांसह तरुण. (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: येथील एका तरुणाने धारदार चार सुरे जवळ बाळगत या चारही सुऱ्यांबरोबरची एक दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली. तसेच या सुऱ्यांसोबतचे आपले छायाचित्र स्वताच्या व्हाॅट्सअ‍ॅप स्टेटसवर स्थापित केले. समाज माध्यमांवरील तरुणाची दृश्यचित्रफित पाहून कोळसेवाडी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. या तरुणाला सूचकनाका भागातून आज अटक केली.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

प्रदीप यादव (२५) असे या तरुणाचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागात राहतो. त्याने एवढे चार धारदार सुरे कोठून आणले. रात्रीच्या वेळेत तो हे सुरे घेऊन कोठे जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या तरुणाने धारदार शस्त्रांची छबी समाज माध्यमांवर का प्रसारित केली. तो कोणाला इशारा होता का, अशा चारही बाजुने पोलीस हे प्रकरण हाताळत आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीत बेकायदा इमारतीत व्यायाम शाळा सुरू करण्याचा प्रयत्न, पालिकेचा फौजदारी कारवाईचा इशारा

कल्याण, डोंबिवली परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी समाज माध्यमांवरील हालचालींवर करडी नजर ठेवली आहे. या पाळतीवरुन हा गंभीर प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. प्रदीप रात्रीच्या वेळेत एकटाच चार धार सुऱ्यांची धार पाहत ते संग्रहित करत आहे, अशी दृश्यचित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली. कोळसेवाडी पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. हा तरुण कल्याण पूर्व भागातील असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी कोळसेवाडी भागातील सूचकनाका भागातून या तरुणाला तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली.

हेही वाचा… Maharashtra SSC Result 2023: ठाणे जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी, यंदा ९३.६३ टक्के इतका जिल्ह्याचा निकाल

पूर्ववैमनस्यातील वादाचा बदला घेण्यासाठी अनेक तरुण अशाप्रकारचा घातक शस्त्रांचा वापर करत आहेत. गेल्या आठवड्यात देवतेची बदनामी करण्यावरुन अटाळी, आंबिवली, वाडेघऱ् भागातील २० तरुणांच्या गटाने एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे पोलीस आता अधिक सतर्क झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In kalyan youth shared a video carrying four sharp knives on social media dvr

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×