scorecardresearch

ठाणे : तडीपार आरोपी अटकेत, भिवंडी पोलिसांची कारवाई

आरोपीविरोधात त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : तडीपार आरोपी अटकेत, भिवंडी पोलिसांची कारवाई
बाल सुधारगृहातून पसार झालेली कोयता गँगमधील दोन अल्पवयीन मुले ताब्यात(प्रातिनिधिक छायाचित्र)

भिवंडी येथील जाफर खान (२३) याला ठाणे पोलिसांनी पाच जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. त्यानंतरही तो भिवंडीत वास्तव्यास होता. मंगळवारी त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये व्यावसायिकाकडून रिक्षा चालकाला मारहाण

हेही वाचा – भिवंडी जवळील टाटा आमंत्रा करोना केंद्रातून पळालेला मोक्कातील गुन्हेगार दोन वर्षांनी अटक

भिवंडी येथे राहणाऱ्या जाफर खान याला ठाणे पोलिसांनी ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या पाच जिल्ह्यांतून वर्षभरापूर्वी हद्दपार केले होते. त्यानंतरही तो भिवंडी शहरात वास्तव्यास होता. याची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 15:39 IST

संबंधित बातम्या