scorecardresearch

Premium

आता ‘धर्मवीर २’, एकनाथ शिंदेंच्या पुढील वाटचालीवर आधारित चित्रपट?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी आता धर्मवीर २ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

dharmveer 2 movie news, dharmveer 2 latest news in marathi
आता 'धर्मवीर २', एकनाथ शिंदे यांचा पुढच्या वाटचालीवर आधारित? (संग्रहित छायाचित्र

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला धर्मवीर या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी आता धर्मवीर २ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडाच्या एक महिन्यापूर्वी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांचे अत्यंत विश्वासू सचिन जोशी यांची या चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका राहिली होती. मराठी अभिनेते व दिग्दर्शक मंगेश देसाई या चित्रपटाचे निर्माते तर प्रवीण तरडे हे दिग्दर्शक होते. धर्मवीर प्रदर्शित झाला तेव्हा एकनाथ शिंदे हे राज्याचे नगर विकास मंत्री होते. त्यांच्या आग्रहास्तव राज्यातील कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी धर्मवीर चित्रपटाचे शो प्रदर्शित केले होते.

हेही वाचा : अवकाळी पावसाचा फटका, मुंबईत नागरिकांची तारांबळ; ठाणे जिल्ह्यात भातपिकाचे नुकसान

Rajkumar Santoshi sentenced to Two years jail
‘घायल’ चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना दोन वर्षांचा तुरुंगवास, जामनगर न्यायालयाने सुनावली शिक्षा
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
razakar-trailer
“ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित
sadhu meher passes away at mumbai residence
ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते साधू मेहर यांचे निधन

‘गद्दारीला क्षमा नाही’ हे आनंद दिघे यांच्या मुखी असलेले वाक्य या चित्रपटाच्या निमित्ताने भरपूर गाजले होते. चित्रपट प्रदर्शित होऊन महिना होताच शिंदे यांनी ठाकरे यांच्या विरोधात बंड करत देशभरात खळबळ उडवून दिली. या बंडाचं जे नेपथ्य रचलं गेलं त्यामध्ये धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनाची महत्त्वाची भूमिका राहिली होती. या पार्श्वभूमीवर धर्मवीर दोन या चित्रपटाचा आज ठाण्यातील कुलशेत भागात मुहूर्त केला जात आहे. सचिन जोशी आणि मंगेश देसाई या दोन मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांमार्फत या मुहूर्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा मुहूर्त होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In thane dharmveer 2 movie based on anand dighe and eknath shinde will hit the screens soon css

First published on: 27-11-2023 at 08:26 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×