बदलापूरः ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाणारे बारवी धरण गुरूवारी काठोकाठ भरले. गुरूवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बारवी धरणात ९९.७६ टक्के इतका पाणीसाठा होता. बारवी धरणाची एकूण उंची ७२.६० मीटर इतकी आहे. गुरूवारी बारवी धरणातील पाण्याने ७२.५८ मीटर इतकी उंची गाठली होती. त्यामुळे धरण ओसांडून वाहण्यासाठी अवघे काही सेंटीमीटर अंतर शिल्लक आहे. त्यामुळे बारवी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यातील नागरिकांसह सर्वच यंत्रणांचे डोळे बारवी धरणाच्या भरण्याकडे लागतात. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर वर्षभर पाणीदिलासा मिळतो. यंदाच्या वर्षात बारवी धरण गेल्या वर्षाच्या तुलनेत संथगतीने भरले. जुन महिन्यात धरण २५ टक्केही भरले नव्हते. जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसाने बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संततधार पावसामुळे बारवी धरण वेगाने भरले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धरण भरण्याची शक्यता वाटत होती. मात्र पावसाने दडी दिल्याने धरण भरल्याचा वेग मंदावला. गुरूवारी बारवी धरण ९९ टक्क्यांपर्यंत भरले होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत बारवी धरणात ९९.७६ टक्के पाणी भरले होते. बारवी धरणात एकूण ३३८.०४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठी असून बारवी धरणात काठोकाठ पाणी भरलेले होते.

हे ही वाचा… कल्याण डोंबिवली पालिकेतील खंडणीखोर कर्मचाऱ्याची लवकरच विभागीय चौकशी, खंडणी विरोधी पथक पालिकेत

हे ही वाचा… डोंबिवलीजवळ हेदुटणे, उत्तरशिव येथे गिरणी कामगारांच्या घरांना जमिनी देण्यास मनसेचा विरोध

बारवी धरणाची उंची ७२.६० मीटर इतकी आहे. गुरूवारी सायंकाळी बारवी धरणातील पाण्यात ७२.५८ मीटर इतकी उंची गाठली होती. कोणत्याही क्षणी बारवी धरणाच्या गोडबोले स्वयंचलित दरवाज्यांमधून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारवी नदीच्या काठी असलेल्या आस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली, आघाणवाडी, फणसवाडी, वाकडीचीवाडी आणि नदी काठावरील इतर शहरांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.