ठाणे : ज्यादा परताव्याची अमिष दाखवून गुंतवणूक दारांकडून पैसे घेतले. परंतू, काही महिन्यानंतर ज्यादा परताव्याने पैसे देणे शक्य झाले नसल्यामुळे एका गुंतवणूक नियोजकाने आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. यामुळे सर्व गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी त्याच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यामध्ये नऊ जणांची ८२ लाख ५७ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाली असून पोलिसांनी तक्रारीच्या आधारे त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक झालेले वृद्ध कळवा भागात कुटूंबासह वास्तव्यास आहेत. निवृत्तीवेतनवर त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. सेवानिवृत्त झाल्यानंतर भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी ठाण्यातील पाचपाखाडी भागात राहणाऱ्या एका गुंतवणूक नियोजककडे विचारणा केली असता, त्याने त्याच्या व्यवसायाबद्दल आणि गुंतवणूक योजनांबाबत त्यांना माहिती दिली. गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला त्याच्याकडील योजना आवडल्या म्हणून त्यांनी सुरुवातीला एका योजनेत ५ लाख रुपयांची दोन टप्प्यात गुंतवणूक केली. गुंतवणूकदाराला या योजनेतील परतावा ठरल्यानुसार मिळाल्यामुळे गुंतवणूकदाराचा त्या व्यक्तीबद्दल विश्वास वाढला. आणि पुन्हा त्यांनी त्या व्यक्तीकडे ७ लाख रुपयांची गुंतवणूक केली. तेव्हाही त्यांना व्याजासह परतावा मिळाला. यानुसार, गुंतवणूक नियोजकाबाबत विश्वास बसल्याने गुंतवणूकदाराने त्यांच्याकडे अधिक गुंतवणूक करण्याचे ठरविले.

Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Chandrapur district bank latest marathi news
चंद्रपूर जिल्हा बँकेची वादग्रस्त नोकर भरती: आजपासून मुलाखत
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
fraud with aqua marine global culture company
एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीची फसवणूक
buldhana government jobs scam
शासकीय नोकरी घोटाळा : बुलढाण्यात बनावट मंत्रालयीन शिक्के, नियुक्तीपत्रे अन् बरेच काही…
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक
mumbai torres jewellers loksatta news
टोरेस फसवणूकप्रकरणी पोलीस ठाण्यासमोर गर्दी, ठेवीच्या परतफेडीसंदर्भात हजारो गुंतवणूकदारांचे अर्ज

हेही वाचा : कल्याणमधील तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तमीळनाडूतील तरूणाकडून लैंगिक अत्याचार

गुंतवणूकदाराने ९ लाख रुपये त्याच्याकडे गुंतवले परंतू, यावेळेस गुंतवणूकदाराला पूर्णपणे परतावा मिळाला नाही. तरी, देखील गुंतवणूक दाराला इतर दुसऱ्या योजनेबाबत सांगून त्यांच्याकडून १० लाखाची पुन्हा गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. आणि गुंतवणूकदाराने प्रक्रिया शुल्कासह १० लाख ८० हजार रुपये गुंतवणूक नियोजकाच्या खात्यावर पाठविले. परंतू, यातील केवळ २ लाख ५० हजार रुपये त्यांना परतावा मिळाला. या योजनेतील परतावा देखील पूर्णपणे मिळाला नसल्यामुळे गुंतवणूकदाराला संशय निर्माण झाला. म्हणून त्याने गुंतवणूक नियोजकाबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. या गुंतवणूकदारासह आणखी ८ जणांनी त्याच्याकडे पैसे गुंतवले होते. यासर्वांचे मिळूण ८२ लाख ५७ हजार ७०० रुपयांची या गुंतवणूक नियोजकाने फसवणूक केली आहे. त्याच्या आत्महत्यानंतर या सर्वच गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Story img Loader