ठाण्यात रिक्षामध्ये महिलेबरोबर नको ते कृत्य! आरोपीला अटक

हेअर ड्रेसर असलेल्या महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी ३० वर्षीय आरोपीला मंगळवारी रात्री अटक केली.

SEXUAL HARRASMENT
संग्रहित छायाचित्र

हेअर ड्रेसर असलेल्या महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी ३० वर्षीय आरोपीला मंगळवारी रात्री अटक केली. आरोपीने दोन वेळा महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती बुधवारी पोलिसांनी दिली. आरोपी आणि पीडित महिला दोघेही एकाच ठिकाणी काम करतात. ठाण्यात घोडबंदर रोडवरील एका ब्युटी सलूनमध्ये पीडित महिला नोकरी करते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मागच्या महिन्यात पीडित महिला ऑटोरिक्षामधून प्रवास करत असताना आरोपी हेमंत सोनावणेने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असे पोलिसांनी सांगितले. आपल्या कृत्याबद्दल हेमंतने नंतर माफी मागितली. त्यामुळे तक्रारदार महिला शांत राहिली. पण त्यानंतरही हेमंतच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही.

ऑफिसमध्ये असतानाही शरीरसुख मिळवण्यासाठी तो तक्रारदार महिलेला त्रास देत होता. ६ डिसेंबरला पुन्हा त्याने ऑटोरिक्षामध्ये महिलेला जबरदस्तीने मिठी मारली. जेव्हा तिने आरोपीच्या जबरदस्तीला विरोध केला तेव्हा त्याने आपल्याला जमिनीवर ढकलून दिले असे तक्रारदार महिलेने सांगितले. हेमंत सोनावणे विरोधात कासारवडावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In thane man held for molesting colleague in autorickshaw

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या