scorecardresearch

Premium

ठाणे : अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी

बसगाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत राकेश बंगेरा (५२) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा विशाल (१७) या घटनेत जखमी झाला.

thane accident, father dies in thane accident, son injured father dies in accident
ठाणे : अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी (संग्रहित छायाचित्र)

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात भरधाव बसगाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत राकेश बंगेरा (५२) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा विशाल (१७) या घटनेत जखमी झाला. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा : जनतेचा टोल आक्रोश मुख्यमंत्र्यांनाही परवडणारा नाही – राज ठाकरे

Explosion ordnance factory Bhandara killed Jawahar Nagar marathi news
भंडारा : आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
case file against woman who stole baby in nashik
नाशिक : पळवलेल्या बाळाचा चार तासात शोध; भिकारी महिलेविरुध्द गुन्हा
pimpri chinchwad fire marathi news, pimpri chinchwad 2 brothers died marathi news,
पिंपरी-चिंचवड : पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू, झोपेत असतानाच काळाचा घाला
two school children died after drown in Wagholi mine
पुणे: वाघोलीतील खाणीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात राहणारे राकेश हे त्यांच्या मुलासह दुचाकीने ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. त्यांची दुचाकी कॅडबरी जंक्शन भागात आली असता, एका भरधाव खासगी बसगाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत राकेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल यांच्या पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In thane son injured father dies in accident at cadbury juction css

First published on: 08-10-2023 at 20:40 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×