scorecardresearch

ठाणे : सेंट जॉन द बाप्टिस्ट शाळेच्या “सेंट जॉन लर्निंग ॲप” चे उद्घाटन

शिक्षकाच्या हातात असलेले तंत्रज्ञान परिवर्तन घडू शकते, या उद्देशातुन हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

ठाणे : सेंट जॉन द बाप्टिस्ट शाळेच्या “सेंट जॉन लर्निंग ॲप” चे उद्घाटन
ठाण्यातील सेंट जॉन द बाप्टिस्ट शाळेच्या "सेंट जॉन लर्निंग ॲप" चे उद्घाटन

सेंट जॉन द बाप्टिस्ट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी सेंट जॉन लर्निंग ॲप विकसित करण्यात आले असून या ॲप चे उद्घाटन गुरुवारी शाळेच्या सभागृहात करण्यात आले. तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेणार नाही, परंतु शिक्षकाच्या हातात असलेले तंत्रज्ञान परिवर्तन घडू शकते, या उद्देशातुन हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे व्यवस्थापक फादर जेरोम लोबो, मुख्याध्यापक फादर थॉमसन किणी, उपमुख्याध्यापक एडवर्ड मास्कारेन्हास,संस्थापक दीपक डायस, फादर ग्लॅस्टन, सिंघानिया एज्युकेशनचे सीईओ डॉक्टर ब्रिजेश कारिया आणि विविध विभागाचे प्रमुख, पालक व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. समन्वयक फियोना मेनडोंजा, सिंथिया सिक्वेरा, व एविट संतमारिया यांच्या नेतृत्वाखाली व अथक प्रयत्नाने तसेच सिंघानिया टीमचे डॉक्टर ब्रिजेश कारिया, मिलिंद वनम, अन्विता शेठ यांच्या मार्गदर्शनाने सेंट जॉन लर्निंग ॲप यशस्वीरित्या निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा : शिंदे गटाला मनसे रसद?; शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी हालचाली

आज विकासासाठी बदलाची अत्यंत गरज आहे. त्याच वेळी स्मार्टफोन, टॅबलेट आणि इंटरनेट यासारख्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने अवलंब केल्याने विकासाला आणखीन चालना मिळेल. सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक उपलब्ध आणि सुलभ होईल. मुलांना विविध शैक्षणिक स्तरावर प्रगती करण्याच्या उद्देशाने सेंट जॉन लर्निंग ॲपची निर्मिती करण्यात आली आहे, असे मुख्याध्यापक फादर थॉमसन किणी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. या ॲपच्या माध्यमातून दररोज शाळेमध्ये मुलांना काय शिकवण्यात आले याची माहिती नोंद केली जाणार आहे.

हेही वाचा : ठाणे : एमएमआरडीएच्या उपनियोजक अधिकाऱ्याला २४ हजारांची लाच घेताना अटक

त्यामुळे पालकांना दररोज मुलांना काय शिकवण्यात आले याची माहिती मिळणार आहे. मुलांना रिव्हीजनसाठी याचा उपयोग होणार असून मुलांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षकांबरोबर विद्यार्थी आणि शाळेने प्रगतीच्या शिखरावर पोहचून उंच भरारी घ्यावी, असेही ते म्हणाले. सींथिया सिक्वेरा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणि शाळेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या