बैलगाडा शर्यतीतून सुरू झालेल्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. पनवेलच्या पंढरीशेठ फडके गटाने कल्याणच्या राहुल पाटील गटावर हा गोळीबार केला असून गोळीबाराच्या घटनेची चित्रफीत प्रसारीत झाली आहे. या प्रकाराने अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून घटनेचा तपास केला जातो आहे.

हेही वाचा- डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकाचा अपहृत मुलगा सुरत मध्ये सापडला

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पनवेलचे पंढरीशेठ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष असून राहुल पाटील हे कल्याणच्या आडीवली गावात राहणारे बैलगाडा मालक आहेत. या दोघांमध्ये मागील वर्षभरापासून बैलगाडा शर्यतीत जिंकण्या-हरण्यावरून सातत्याने वाद सुरू होते, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. दोन्ही गटाकडून अनेकदा समाज माध्यमांवर एकमेकांना आव्हाने दिली जात होती, अशीही या क्षेत्रातील खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्यामुळेच अंबरनाथमधील बोहोनोली गावात आज या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांच्यात समेट घडवण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीपूर्वीच अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीत हे दोन गट समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली.

हेही वाचा- डोंबिवली: रस्त्यांची कामे सुरू होताच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लावले मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे फलक

अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील सुदामा हॉटेलजवळ राहुल पाटील आणि पंढरीशेठ फडके हे समोरासमोर आले. यानंतर त्यांच्यात वाद होऊन पंढरीशेठ फडके समर्थकांनी राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला, अशी प्राथमिक माहिती आहे. यावेळी तब्बल ९ ते १० गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सोबतच राहुल पाटील यांच्या समर्थकांची गाडी सुद्धा फोडण्यात आली. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेनंतर दोन्ही गटांनी तिथून काढता पाय घेतला. मात्र काही वेळातच राहुल पाटील यांचे समर्थक घटनास्थळी जमले. त्यामुळे या परिसरात परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या घटनेमुळे बैलगाडा शर्यतीतले वाद अतिशय टोकाला गेल्याचे चित्र आहे. शासनाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली असली तरी आजही अनेक शर्यती विनापरवानगी होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात असल्याच्या सुरस कथा कायमच चर्चिल्या जातात.