मार्श हॅरिअर (दलदल ससाणा)

शिकारी पक्षी म्हणून ओळखला जाणारा पक्षी म्हणजे ‘मार्श हॅरिअर’ अर्थात दलदल ससाणा. हा पक्षी जुलै महिन्यात भारतामध्ये दाखल होतो व पुढील वर्षांच्या मे महिन्यात परतीच्या प्रवासाला लागतो. म्हणजेच दलदल ससाणा हा पक्षी तब्बल दहा महिने भारतात वास्तव्यास असतो. अमेरिकेव्यतिरिक्त जगभर सर्व देशांमध्ये हा पक्षी आढळून येतो.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

यलो व्ॉगटेल (धोबी)

युरोप आणि आशिया खंडामध्ये मुख्यत्वे आढळणारा पक्षी म्हणजे ‘यलो व्ॉगटेल’. या पक्ष्याला मराठीमध्ये ‘धोबी’ असेही म्हटले जाते. युरोप आणि आशिया खंडातील सौम्य वातावरणातून हे पक्षी स्थलांतरित होऊन येत असतात. त्यांचे मूळ वास्तव्य पश्चिम युरोपात आहे. आकाराने सडपातळ असणारा हा पक्षी पंधरा ते सोळा सेंमी लांबीचा असतो. धोबी हा पक्षी सतत आपली शेपूट हलवीत असतो. पक्षीनिरीक्षणाच्या वेळी धोबी या पक्ष्याची ही हालचाल दिसून येते.

ब्ल्यू थ्रोट (नीळकंठ)

‘ब्ल्यू थ्रोट’ या नावातच या पक्ष्याचे वैशिष्टय़ दिसून येते. कंठाचा भाग ‘निळ्या’ रंगाचा असल्याने हा पक्षी ब्ल्यू थ्रोट या नावानेच प्रचलित आहे. ब्ल्यू थ्रोट हा युरोप आणि आशिया खंडातील रहिवासी पक्षी हिवाळ्यात आफ्रिका आणि भारतीय उपखंडामध्ये आपले स्थलांतर करीत असतो. तपकिरी रंगाच्या या पक्ष्याची शेपूट मात्र काळ्या रंगाची असते. या शेपटीवर लाल रंगाचे पट्टे पाहायला मिळतात.

रोझी स्टारलिंग

रोझी स्टारलिंग हा साळुकींचा प्रकार आहे. साळुंकी हा पक्षी कुठेही पाहायला मिळतो. परंतु गुजरातहून खास हिवाळ्याच्या काळात स्थलांतर करून येणारी ‘रोझी स्टारलिंग’ ही साळुंकी पक्षीप्रेमींच्या विशेष आवडीची ठरते. रोझी स्टारलिंगचे अंग गुलाबी तर पाय आणि चोच फिकट नारिंगी रंगांची असते. असा हा रंगीबेरंगी पक्षी हिवाळ्यात पाहण्याची मजा काही औरच आहे.

वरडीटर फ्लायकॅचर

भारतीय उपखंडात आढळणारा आणि मुख्यत्वे दक्षिण हिमालयातील रहिवासी पक्षी म्हणजे ‘वरडीटर फ्लायकॅचर’. वरडीटर फ्लायकॅचर हा पक्षी नीळसर रंगाचा असतो. परंतु पक्ष्याच्या लिंगानुसार त्याच्या रंगछटेमध्ये फरक दिसून येतो. उदाहरणार्थ- नर वरडीटर फ्लायकॅचर प्रखर निळ्या रंगाचा असून त्याचा डोळ्याचा भाग काळ्या रंगाचा असतो. त्याचप्रमाणे वरडीटर फ्लायकॅचर (मादी) फिकट निळ्या रंगामध्ये आढळून येते.

नॉर्दन शॉव्हेलर

नॉर्दन शॉव्हेलर हा बदकाचा प्रकार आहे. युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेचा मूळ रहिवासी असणारा हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण युरोप, भारतीय उपखंड, दक्षिणपूर्व आशिया, मध्य आशिया, दक्षिण अमेरिका आदी ठिकाणी स्थलांतरित होत असतो.

बोनेलीज ईगल

‘बोनेली’ या शास्त्रज्ञाने या पक्ष्याचा शोध लावला. म्हणूनच बोनेली या शास्त्रज्ञाच्या नावाने बोनेलीज ईगल म्हणून या पक्ष्याला ओळखले जाते. पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गरुड या पक्ष्याचा बोनेलीज ईगल हा प्रकार आहे.

ग्रे-व्ॉग टेल

ग्रे-व्ॉग टेल हा छोटा व आपली शेपूट सारखी हलवणारा पक्षी आहे. म्हणून, त्याचे नाव व्ॉग टेल असून या व्ॉग टेल वर्गात अनेक प्रकारचे पक्षी येतात. त्यातील हा ग्रे-व्ॉग टेल असून पिवळ्या व्ॉग टेलप्रमाणे दिसणारा असला तरी, त्याच्या पोटावर पिवळा रंग असतो व बाकी भाग हा राखाडी असतो. युरोप व आशियामध्ये आढळणारा हा पक्षी येथे थंडी वाढल्यावर आशियाचा दक्षिणेकडील भाग, आफ्रिका आदी प्रदेशांकडे वळतो. मुख्यत्वे पाणथळ अथवा नदी किनारी असलेल्या प्रदेशांमध्ये हा पक्षी वास्तव्य करतो. येथे आढळणाऱ्या कीटकांवरच ग्रे-व्ॉग टेलची गुजराण असते.

ग्रेटर स्पॉटेड ईगल

हा पक्षी हिमालयातून येणारे आहेत. शिकारी पक्षी म्हणून ग्रेटर स्पॉटेड ईगल या पक्ष्याची ओळख आहे.

सल्फर बेलिड वार्बलर

पिवळ्या पोटाचा वटवटय़ा पक्षी असे याला संबोधले जाते. भुवईसारखी पांढरी रेघ या पक्ष्याच्या डोळ्यावर पाहायला मिळते. पंखांवर काहीच नाही. झाडांच्या खोडावर गोल फिरत राहतो.

रोझी स्टारलिंग

हे पक्षी भोरडी या नावाने ओळखले जातात. हिमालयातून हजारोंच्या संख्येने थवे येऊरच्या जंगलात वास्तव्यास येतात. डोक्याकडचा भाग काळा असतो. मात्र दुर्बिणीतून पाहिल्यावर गुलाबी रंग दिसून येतो.

ब्लॅक हेडेड बंटिंग

काळ्या डोक्याचा भारीट अशी या पक्ष्याची ओळख आहे.  डोक्यावरचा काळा रंग असतो.

ब्लॅकर्ड काईट

हिमालयातून येणाऱ्या या पक्ष्याचे वैशिष्टय़ म्हणजे हा पक्षी समूहात दिसतो. पंखांच्या मध्ये पांढरा रंग असून या पक्ष्याच्या कानाजवळ काळा रंग आढळतो.

ट्रीपीपीट

व्ॉकटेल पक्ष्यापैकी ट्रीपीपीट या पक्ष्याची प्रजात आहे. व्ॉगटेल पक्षी साधारण गवतावर दिसून येतात. मात्र ट्रीपीपीट हा पक्षी झाडांवर जास्त प्रमाणात दिसतो.

अ‍ॅशिट्रोंगो

कोतवालसारखा दिसणारा हा पक्षी आहे. या पक्ष्याचा डोळ्याजवळच्या लाल रंगामुळे अ‍ॅशिट्रोंगो पक्षी म्हणून ओळखला जातो.

वेगवान नागरीकरणाचे स्थलांतरित पक्ष्यांसमोर आव्हान 

वाढते प्रदूषण, शिकारींच्या संकटामुळे अस्तित्वाची लढाई

थंडीचे वारे वाहू लागल्यानंतर स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे हजारो किलोमीटरचा प्रवास करून ठाणे शहरात दाखल होतात. विस्तृत खाडी किनारा, त्यालगत असलेले खारफुटीची जंगले आणि येऊरसारखे वन क्षेत्र, त्यामुळे जगण्यासाठी आवश्यक पूरक वातावरण या परिसरामध्ये असल्याने अनेक पक्षी या भागात तीन ते चार महिने निवास करतात. उन्हे तापू लागल्यानंतर हे पक्षी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात. असा वार्षिक क्रम असलेल्या या पक्ष्यांच्या समोर शहरातील नागरीकरणाचे मोठे संकट उभे राहिले आहे. वेगाने वाढणारे सिमेंटची जंगले, प्रदूषित होणारी खाडी, बुजवली जाणारी खारफुटी, वायुप्रदूषणाची वाढती तीव्रता आणि ध्वनिप्रदूषणाचा विळखा अशा सगळ्याच गोष्टी पक्षांसाठी घातक ठरत आहेत. तर बहुसंख्येने येणाऱ्या या पक्ष्यांची मांस, रंगीबेरंगी पिसे आणि पंखांसाठीही शिकार होऊ लागली आहे. त्यामुळे दरवर्षी मोठय़ा संख्येने येणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पक्ष्यांच्या रक्षणाची जबाबदारी येथील नागरिकांनीही उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

हिवाळ्याची चाहूल झाल्यानंतर ठाणे जिल्ह्य़ात स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात होते. जगभरात होणाऱ्या वातावरणातील बदलाचा व मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या निसर्गाच्या ऱ्हासाने येथील पक्ष्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांच्या संख्यांवर त्याचा दरवर्षी विपरीत परिणाम होत आहे. खाडी किनाऱ्यावरील पाणथळ भूमी, वनजमिनीवर असे अनेक पक्षी दिसून येत असून गवत, कीटक, अळ्या, अंडी यांना फस्त करून त्यावर त्यांची उपजीविका चालते. तसेच काही पक्षी हे आपल्या साथीदाराबरोबर घरटी बांधून पिलांना जन्म देऊन त्यांची उत्पत्ती वाढवतात. ऑगस्ट, सप्टेंबरपासून या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू होते व मार्च-एप्रिलपर्यंत असे पक्षी आपल्याकडे दिसतात. एप्रिलनंतर मात्र ते परतीच्या प्रवासाला लागतात. पक्ष्यांच्या या प्रवासावर वातावरणावर होणाऱ्या बदलाचा गंभीर परिणाम होत आहे. अवेळी येणारे चक्रीवादळ, त्यामुळे होणारा अवेळी पाऊस यामुळे पक्ष्यांना त्रास सहन करावा लागतो. युरोप, रशिया, आफ्रिकेतून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचे स्थलांतर भारतात प्रामुख्याने उत्तर दक्षिण असे होते व बहुतांश स्थलांतरित पक्षी युरोप, रशिया व आफ्रिकेतून भारतात येतात. काही पक्षी हे पूर्वेकडून येतात. हा प्रवास साधारण चार ते सहा हजार किलोमीटरचा असतो व परतीच्या प्रवासाला पण त्यांना एवढय़ाच अंतराने जावे लागते. प्रवासात अनेक ठिकाणी दिवसा ते जमिनीवर उतरून अन्नग्रहण करतात व विश्रांती घेऊन पुढील प्रवास सुरू करतात. बहुतांशी वेळा हा प्रवास रात्रीच्या वेळी केला जातो. त्यामुळे त्यांच्यावर शिकारी पक्ष्यांचे आक्रमण कमी होते व रात्री तापमान कमी असल्याने त्यांना उडणे सोपे होते, अशी माहिती पक्षीप्रेमी देतात.

खाडय़ांच्या पाण्यातील विषारी रसायने, प्लास्टिकचा अतिरिक्त वापर यामुळे या पक्ष्यांना विषबाधा होऊन त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. तलावांमध्येही विषारी आणि निरुपयोगी वनस्पतींनी आपला विस्तार वाढवल्याने उपासमारीचे संकटही या पक्ष्यांवर येऊ लागले आहे. तर येऊरसारख्या निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी आणि अतिउत्साही तरुण मांसासाठी आणि हौसेखातरही या पक्ष्यांची शिकार करत असल्याची बाब पक्षीमित्राच्या लक्षात आली आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांविषयी जागृती होऊन त्यांच्या संरक्षणासाठी सामान्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत पक्षीमित्रांकडून व्यक्त केले जात आहे.