ठाणेकरांना काश्मीरचा इतिहास जाणून घेता यावा यासाठी ठाणे कला भवन येथे ४५ मीटर लांब आणि सात फुट उंचीच्या एका कापडावर संपूर्ण काश्मीरचा इतिहास प्रदर्शीत करण्यात आला आहे. यासह विदेशातील आणि देशातील विविध राज्यांतील कलाकारांच्या चित्रांचा देखील या प्रदर्शनात सामावेश करण्यात आला आहे. ठाणे कला भवनात ‘आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात काश्मीरचा इतिहास उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ९ जून पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खूले असणार आहे.

काश्मीरला काश्मीर हे नाव कसे पडले, कोणकोणत्या राजांनी काश्मीरमध्ये आपले शासन प्रस्तापित केले, मुाल आणि अफगाणी फौजांमध्ये झालेले युद्ध, त्यानंतर अफगाण राजाचा पराभव करून शीखांनी काश्मीरमध्ये प्रस्थापित केलेले राज्य अशा विवीध घटनांचा इतिहास उलगडून दाखविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. महात्मा गांधींनी देशात लढा कसा दिला ते कारगील युद्धांपर्यतचा संपूर्ण इतिहास १८ वर्षांपूर्वी भानू दुधात यांनी हे कापडावरील चित्र रेखाटले आहे. हे कापड ज्यूटचे असून चित्र साकारण्यासाठी कोणतेही रासायनिक रंग वापरण्यात आले नाही. या चित्रांमध्ये काश्मीरमध्ये नद्यांचा जन्म, येथील टेकडय़ा, नागदेवतांमुळे गावांना नावे कशी पडली, त्या काळातील येथील नागरिकांचे राहणीमान यात साकारण्यात आले आहे.

Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
Katchatheevu Island
पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे, ब्रिटिशांकडून भारताकडे, भारताकडून श्रीलंकेकडे… कचाथीवू बेटाचा वादग्रस्त प्रवास!
centre to consider revoking afspa withdrawing troops from Jammu and Kashmir says amit shah
जम्मू-काश्मीरमधून लष्कर, अफ्स्पा मागे घेण्याचा विचार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सूतोवाच  

४५ मीटरच्या या कापडामध्ये अवघा काश्मीरचा वेगळ्या पद्धतीने काश्मीर सामावण्यात आला आहे. यासह विदेशातील कलाकारांनी साकारलेल्या चित्रांचेही येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात जर्मनीच्या इरेने रुंग, अमेरिकेच्या श्री पसापूला, मलेशियाचे डी. थानसेल्वम, दुबईचे नैनश्री जोशी तर भारतातील आसाममधील स्वाती जैन, पुण्याच्या पाश्वी विंचूरकर आणि महालक्ष्मी पवार, आसामच्या निलाक्षी बेझबरुहा, भोपाळचे राकेश कुमार सोनी आणि पंजाबमधील बबीता हुंडल आणि जसपाल सिंग यांनीही चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. कापडावरील हे चित्र साकारण्यासाठी मला ४२ दिवस लागले. कारगील युद्ध झाल्यानंतर सैनिकांना श्रद्घांजली वाहण्यासाठी हे चित्र बनविले. हे चित्र विक्री झाल्यानंतर त्यातून येणारी ५० टक्के रक्कम ही शहिदांना देणार असल्याचे भानु दुधत यांनी सांगितले.