ठाणेकरांना काश्मीरचा इतिहास जाणून घेता यावा यासाठी ठाणे कला भवन येथे ४५ मीटर लांब आणि सात फुट उंचीच्या एका कापडावर संपूर्ण काश्मीरचा इतिहास प्रदर्शीत करण्यात आला आहे. यासह विदेशातील आणि देशातील विविध राज्यांतील कलाकारांच्या चित्रांचा देखील या प्रदर्शनात सामावेश करण्यात आला आहे. ठाणे कला भवनात ‘आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात काश्मीरचा इतिहास उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ९ जून पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खूले असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मीरला काश्मीर हे नाव कसे पडले, कोणकोणत्या राजांनी काश्मीरमध्ये आपले शासन प्रस्तापित केले, मुाल आणि अफगाणी फौजांमध्ये झालेले युद्ध, त्यानंतर अफगाण राजाचा पराभव करून शीखांनी काश्मीरमध्ये प्रस्थापित केलेले राज्य अशा विवीध घटनांचा इतिहास उलगडून दाखविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. महात्मा गांधींनी देशात लढा कसा दिला ते कारगील युद्धांपर्यतचा संपूर्ण इतिहास १८ वर्षांपूर्वी भानू दुधात यांनी हे कापडावरील चित्र रेखाटले आहे. हे कापड ज्यूटचे असून चित्र साकारण्यासाठी कोणतेही रासायनिक रंग वापरण्यात आले नाही. या चित्रांमध्ये काश्मीरमध्ये नद्यांचा जन्म, येथील टेकडय़ा, नागदेवतांमुळे गावांना नावे कशी पडली, त्या काळातील येथील नागरिकांचे राहणीमान यात साकारण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International art exhibition organized in thane kala bhavan
First published on: 07-06-2017 at 04:21 IST