मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत असणारे सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने कल्याणकरांच्या भेटीला येणार आहेत. एक लाखाहून अधिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडीत डॉ. लहाने यांनी जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते लहाने यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अशा अवलियाला ऐकण्याची संधी कल्याणकरांसमोर सुभेदारवाडा कट्टय़ाच्या वतीने चालून आली आहे.
कल्याणातील सुभेदारवाडा कट्टय़ाच्या वतीने शनिवार ७ नोव्हेंबर रोजी ‘डोळे आणि आरोग्याची काळजी कशी राखावी’ या विषयावर डॉ. तात्याराव लहाने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम सुभेदारवाडा हायस्कूल, गांधी चौक, कल्याण (प.) येथे सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत होणार आहे.