लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील नवीन रेल्वे आरक्षण केंद्राच्या बाहेर अनेक दिवसांपासून वर्दळीच्या महात्मा गांधी रस्त्यावर लोखंडी खांब, लोखंडी पट्ट्या आणून ठेवण्यात आहेत. रिक्षा उभ्या करण्याच्या ठिकाणी हे सामान ठेवण्यात आल्याने रिक्षा चालक आणि प्रवाशांची याठिकाणी घुसमट होत आहे.

eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल मे कूछ काला है’ म्हणत अंजली दमानियांची सूचक पोस्ट
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Bachchu Kadu On Eknath Shinde :
Bachchu Kadu : “मी शिंदेंना तेव्हाच सांगितलं होतं की भाजपाकडून…”, बच्चू कडूंचा दावा; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं भाष्य!
illegal inauguration hall
डोंबिवली गोळवलीतील बेकायदा शुभारंभ हाॅल भुईसपाट; उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पालिकेच्या आय प्रभागाची कारवाई
thane police
डोंबिवलीतील दोन जण पिस्तुलसह कल्याणमध्ये अटक
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Mallikarjun Kharge
“मी पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक”, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ; भाजपाकडून टीका!

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील विष्णुनगर मासळी बाजारासमोरील महात्मा गांधी रस्त्यावर हे सामान ठेवण्यात आले आहे. हे सामान कोणी आणून ठेवले आहे याविषयी कोणाला काही माहिती नसल्याने तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न पादचारी, रिक्षा चालकांना पडला आहे. रेल्वे स्थानक भागातील हा रस्ता अरूंद आहे. डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, सरोवरनगर, देवीचापाडा, गरीबाचापाडा भागातून रिक्षेने येणारे प्रवासी या रस्त्यावर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी उतरतात. लोखंडी सामानामुळे रिक्षा चालकांना वाहन रस्त्याच्याकडेला घेता येत नाही. प्रवाशांना रिक्षेतून उतरताना या सामानाचा अडथळा होतो. जड वाहने या रस्त्यावरून धावतात. या वाहनांना लोखंडी सामानाचा अडथळा येतो.

आणखी वाचा-स्थलांतरीत पक्ष्यांची जिल्ह्याकडे यंदाही पाठ, डोंबिवलीतील मुख्य ठिकाणी मोजक्याच पक्ष्यांची नोंद, वसईत १२८ प्रजातींची निरीक्षकांडून नोंद

लोखंडी पट्ट्या रस्त्यावर पसरून ठेवण्यात आल्या आहेत. या पट्ट्या गुळगुळीत असल्याने या पट्ट्यांवरून जाणारे प्रवासी दररोज पाय घसरून पडतात. हे सामान रस्त्यावरून हलविण्याची रिक्षा चालकांची मागणी आहे. पण हे सामान याठिकाणी कोणी, कधी आणून ठेवले आहे. याची कोणतीही माहिती नसल्याने तक्रार कोठे करायची, असा प्रश्न रिक्षा चालकांना पडला आहे. अनेक प्रवासी या रस्त्यावरील लोखंडी सामानाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

मालवाहू अवजड वाहन लोखंडी सामान ठेवलेल्या रस्त्यावर आले तर या भागातून ते वाहन पुढे नेताना चालकाला कसरत करावी लागते. या कसरतीमध्ये या रस्त्यावर दररोज कोंडी होत आहे. वाहतूक पोलीसही हे सामान ठेवणाऱ्याचा शोध घेत आहेत. डोंबिवली पश्चिमेतील रस्ते वाहतूक विभागाने एक दिशा करून वाहतुकीत सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी रस्त्यावरील लोखंडी सामानाने मात्र पादचाऱ्यांसह वाहन चालकांची कोंडी केली आहे.