ठाणे : घरातील पाळीव प्राणी हा आपल्या कुटुंबातील अविभाज्य भाग होतो. त्याच्या निधनानंतर आपण केवळ त्याच्या आठ‌वणी सांगत असतो. परंतु ठाण्यातील जाधव कुटुंबियाने त्यांच्या पाळीव श्वानाचे ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात तिथीप्रमाणे वर्षश्राद्ध केले. जाधव कुटुंबियांना त्याचा इतका लळा लागला होता की, आठवणी सांगताना आजही हे कुटुंब भावूक होत आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीत तलावात बुडून बहिण भावाचा मृत्यू

bhaindar uttan marathi news
भाईंदरच्या उत्तन येथील घटना, खड्ड्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Shiv Sena deputy leades son hit a couple with a car Mumbai
धनिकपुत्राची दांडगाई! शिवसेना उपनेत्याच्या मुलाची मोटारीने दाम्पत्याला धडक, दोन किलोमीटरपर्यंत फरफटल्याने महिलेचा मृत्यू
Bhiwandi, girl, sexually assaulted,
नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, भिवंडीत धक्कादायक प्रकार
five people survived after drown in waterfall in lonawala but three died
लोणावळा: ‘त्या’ धबधब्याच्या प्रवाहातून १० पैकी पाच जण सुखरूप वाचले, वाहून गेलेल्या ५ जणांपैकी तिघांचा मृत्यू
seven month old baby swallowed three keys the doctors of Rajawadi Hospital saved the babys life
सात महिन्याच्या बाळाने गिळल्या तीन चाव्या, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचविले बाळाचे प्राण…
Married woman commits suicide in farm with baby nashik
विवाहितेची बाळासह शेततळ्यात आत्महत्या
newborn baby girl killed by father
नवजात जुळ्या मुलींचा वडिलांकडून खून; मुलाच्या हव्यासापोटी क्रूर कृत्य
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!

खोपट येथील दर्शन टाॅवर कुटुंबात किरण जाधव त्यांची पत्नी निता आणि मुलगा केतन हे राहतात. केतन हे लहान असताना त्यांनी श्वानासाठी हट्ट केला होता. त्यामुळे किरण यांनी १४ मे २००७ मध्ये त्यांच्या नातेवाईकांकडून दीड महिन्यांच्या श्वानाचे पिलू आणले होते. त्याचे नाव शिरो असे ठेवण्यात आले. हळू-हळू या श्वानाचा लळा जाधव कुटुंबियांना लागत गेला. दरवर्षी ३० मार्चला शिरोचे वाढदिवस साजरे केला जात होता. या वाढदिवसासाठी किरण हे त्यांच्या सर्व कुटुंबियांना बोलवत. किरण यांनी शिरोला स्वत:च्या मुलाप्रमाणे ‘शिरो किरण जाधव’ असे नाव दिले होते. त्यामुळे शिरो हा कुटुंबाचा सदस्य झाला होता. केतन यांनी त्यांच्या हातावरही शिरोचे नाव गोंदले आहे. दररोज जाधव कुटुंबिय शिरोला बाहेर फेरफटका मारण्यासाठी नेत असे. गेल्यावर्षी ७ जूनला शिरो याचे वृद्धापकाळाने निधन झाले. शिरोच्या निधनामुळे जाधव कुटुंबियाला अतीव दु:ख झाले होते. श्वानाचे आपण वर्षश्राद्ध करावे असा निर्णय जाधव कुटुंबाने घेतला होता. त्यामुळे रविवारी शिरो याचे तिथी प्रमाणे कौपिनेश्वर मंदिरात वर्षश्राद्ध ठेवण्यात आले होते.

कौपिनेश्वर मंदिरात वर्षश्राद्ध

शिरो आमच्या कुटुबांचा एक सदस्य झाला होता. शिरोच्या अनेक आठवणी आहेत. त्याच्या निधनानंतर आम्ही त्याचे वर्षश्राद्ध ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कौपिनेश्वर मंदिरात वर्षश्राद्ध झाले. – धनश्री सोहनी, केतन यांच्या मावशी.