सत्तेचा गैरवापर किती करायचा, याच्या मर्यादा सध्याच्या महाराष्ट्र सरकारने सोडल्या आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर कारवाई होत नसून यातूनच सरकारचा आजवरचा सर्वात मोठा पक्षपात दिसून आला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेचे माजी  विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील यांच्यावर नुकतीच शस्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटील हे मिलींद पाटील यांच्या कळवा येथील निवासस्थानी आले होते. यावेळेस राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड,  शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी अभिजीत पवार यांच्या कार्यालयासही त्यांनी भेट दिली. यावेळी ते प्रसारमाध्यमा॔शी बोलत होते.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार

सत्तेचा गैरवापर किती करायचा, याच्या मर्यादा सध्याच्या महाराष्ट्र सरकारने सोडल्या आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. राज्य हातात आल्यानंतर ज्या यंत्रणा आहेत. त्यांचा गैरवापर सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता हे उघड्या डोळ्यांनी हे पहात असून जनतेला हे मान्य नाही. योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता यावर निकाल देईल, असेही ते म्हणाले.

महेश आहेर यांच्या विरोधात प्रचंड पुरावे देण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष महेश आहेर यांच्यावर कारवाईसाठी आग्रही असतानाही कारवाई केली जात नसल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, यावरून तुम्हालाच समजत असेल की सरकार किती पक्षपाती आहे, याचे सर्वात मोठे हेच उदाहरण आहे. अतिशय टोकाची पद्धत या सरकारने अंगीकारली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.