Jaydeep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा किल्ला कोसळला आणि महाराष्ट्रात आरोपांच्या फैरी सुरु झाल्या. सरकारने अनुभव नसलेल्या शिल्पकाराला पुतळा तयार करण्यासाठी दिला. सरकारने शिल्पकार जयदीप आपटेला लपवलं आहे. या प्रकारचे आरोप झाले. तसंच १ सप्टेंबरला निषेध मोर्चाही काढण्यात आला. ज्यामध्ये सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. या सगळ्या घडामोडी घडत असताना जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) फरार होता. त्याला ४ सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी अटक केली. जयदीप आपटेच्या अटकेमुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकणार आहेत. मात्र त्याला कशी अटक केली? हे आपण जाणून घेणार आहोत. २६ ऑगस्टला पुतळा कोसळला तेव्हापासून आपटे फरार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. दुपारी १ वाजून १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शी तर हळहळलेच. मात्र पुतळा पडल्याचे जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले त्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहेत. त्यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त अतिशय नाराज झाले. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागितली. तर विरोधकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. यानंतर शिल्पकार जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याला शोधण्यासाठी पोलीस त्याच्या घरीही गेले होते. मात्र तो फरार झाला होता. तेव्हापासून जयदीप आपटेला ( Jaydeep Apte ) अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली होती. जयदीप आपटेच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. या सगळ्या परिस्थितीत जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) फरारच होता. ४ सप्टेंबरला रात्री उशिरा जयदीप आपटेला कल्याणमधून अटक करण्यात आली. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला. (Photo - ANI) हे पण वाचा- Jayadeep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर चर्चेत आलेला शिल्पकार जयदीप आपटे कोण? ४ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? जयदीप आपटे फरार असल्याने त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी सात पथकं तयार केली होती. जयदीप आपटे कल्याणमध्ये राहतो तिथे जाऊनही पोलिसांनी चौकशी केली पण तो घरी नव्हता. पोलिसांनी त्याच्या आई आणि पत्नीची चौकशी केली होती. त्यानंतर जयदीप आपटेचे काही नातेवाईक शहापूरमध्ये राहतात तिथेही जाऊन पोलिसांनी चौकशी केली. मात्र जयदीप आपटे सापडत नव्हता. ४ सप्टेंबरच्या रात्री अंधाराचा फायदा घेऊन जयदीप आपटे पोलिसांची नजर चुकवून आई आणि पत्नीला भेटायला त्याच्या राहत्या घरी आला होता. त्यावेळीच पोलिसांनी त्याला अटक केली. एखाद्या चित्रपटात दाखवलं जातं त्याप्रमाणे जयदीप आपटेला ( Jaydeep Apte ) अटक करण्यात आली. जयदीप आपटेच्या अटकेमुळे या प्रश्नांची उत्तरं मिळणार? १) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं काम जयदीप आपटेला कसं मिळालं? २) जयदीप आपटेला शिल्पकार म्हणून फार अनुभव नव्हता तरीही इतका मोठा पुतळा उभारण्यासाठी त्याने काय तयारी केली? ३) जयदीप आपटे आणि श्रीकांत शिंदे यांची मैत्री आहे असं बोललं जातं या आरोपामागचं तथ्य काय? ४) पुतळा कोसळल्यापासून जयदीप आपटे नेमका कुठे होता? त्याला पळून जाण्यात कुणी मदत केली? ५) जयदीप आपटेने पुतळा कोसळू शकतो किंवा तशी दुर्घटना होऊ शकते याचा अंदाज कुणाला दिला होता का? ६) जयदीप आपटेवर काम पूर्ण करण्यासाठी कुणाचा दबाव होता का? ७) जयदीप आपटेने जो पुतळा उभारला त्यासाठी त्याने नेमकी किती दिवस आधी तयारी सुरु केली होती ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता जयदीप आपटेला अटक झाल्याने मिळू शकणार आहेत. जयदीप आपटे फरार होता. त्याच्याविरोधात अनेक आरोप विरोधकांनी केले. आता या प्रकरणात पुढे काय काय घडतं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.