ठाणे : ठाण्यात राबविण्यात येणाऱ्या समूह पुनर्विकास योजनेच्या (क्लस्टर) माध्यमातून विविध पक्षांतील माजी नगरसेवकांच्या गळ्याशी फास आणून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे काम सुरू झाले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. क्लस्टर योजनेमुळे झोपडपट्टी पुनर्विकास पूर्णपणे बंद असल्याचे सांगत स्वप्न सत्यात उतरतील तेवढीच दाखवायची असतात. जनता मूर्ख नसते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात झोपडपट्टी, चाळी आणि बेकायदा इमारतीचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत अधिकृत इमारतींना सहभागी होण्याची सक्ती करणारा कायदा करण्यात आला होता. परंतु, यावरून टीका होऊ लागताच सरकारने अधिकृत इमारतींच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

हेही वाचाा – ठाणे : लाचेप्रकरणी न्यायालयाचा कनिष्ठ लिपीक अटकेत

हेही वाचा – ठाणे : कोपरी उड्डाणपुलाच्या डांबरीकरणासाठी मध्यरात्री वाहतूक बदल

जुन्या ठाणेकरांना क्लस्टर योजनेची जबरदस्ती करणारे शिंदे सरकार क्लस्टरमध्ये न आल्यास जेलमध्ये टाकू, अशी धमकी देत होते. पण वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्यानंतर माघार घेतली आणि विकासकामांना परत एकदा सुरुवात झाली, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. हेच क्लस्टर संपूर्ण ठाण्यात पसरले आहे आणि ह्याच क्लस्टर अंतर्गत विविध पक्षातील माजी नगरसेवकांच्या गळ्याशी फास आणून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे काम सुरू झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. अर्थात, कोणी काहीही म्हणो… आजच्या जिवंत असलेल्या दोन पिढ्या सोडूनच द्या. त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्यांना क्लस्टर बघायला मिळाले तर नशीब त्यांचे, अशी टीकाही आव्हाडांनी केली. १०० एकर मोकळ्या जमिनीवर लोढा आणि रुस्तमजी २० वर्षे इमारती बांधू शकले नाहीत. तर, क्लस्टर कस काय होणार पुढच्या 50 वर्षांत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.