ठाणे: माझ्याविरोधात आता कशाकशाचा वापर होतोय, ते बघुया; जितेंद्र आव्हाड यांचे विधान | Jitendra Awad statement regarding the crime of molestation amy 95 | Loksatta

ठाणे: माझ्याविरोधात आता कशाकशाचा वापर होतोय, ते बघुया; जितेंद्र आव्हाड यांचे विधान

माझ्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये टाकून कार्यकर्त्यांना घाबरवायचे होते.

jitendra-awhad-6
माझ्याविरोधात आता कशाकशाचा वापर होतोय, ते बघुया; जितेंद्र आव्हाड यांचे विधान

माझ्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये टाकून कार्यकर्त्यांना घाबरवायचे होते. आता बघु माझ्याविरोधात कशाकशाचा वापर होतोय. रणांगणामध्ये उतरल्यावर परिणामांची पर्वा करायची नसते आणि या काळात केवळ लढायचे असते. त्यामुळे मीही लढतोय, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. तसेच त्यांचे मोर्चे कुठेही वळतील पण, जनतेचा मोर्चाही वळायला हवा ना, तो कुठे वळतोय, ते बघुया, असा टोलाही त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेला यावेळी लगावला.

हेही वाचा >>>उल्हासनगरः प्रदुषणामुळे उल्हास नदीत पुन्हा जलपर्णी;जलपर्णीची वेगाने वाढ, पाणी उचल केंद्रांना धोका

सह्याद्री अतिथीगृहामध्ये राज्यातील प्रशासकीय अधिकारी भुषण गगराणी यांना भेटण्यासाठी गेलो होते. त्यांच्याकडे माझे महत्वाचे काम होते. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. माझ्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाला, त्या घटनेच्या दिवशी माझी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत भेट झाली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांची भेट झालेली नाही. माझ्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला, हे मी आयुष्यात कधीच विसरु शकत नाही, असेही ते म्हणाले. माझ्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मला जेलमध्ये टाकून कार्यकर्त्यांना घाबरवायचे होते. आता बघु माझ्याविरोधात कशाकशाचा वापर होतोय. आता कोणतीही गुन्हा दाखल केला तर त्यासाठी माझी तयारी आहे. रणांगणामध्ये उतरल्यावर परिणामांची पर्वा करायची नसते आणि या काळात केवळ लढायचे असते. त्यामुळे मीही लढतोय, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात वर्षभरात २ कोटी ७२ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

ज्याला जिथे जायचे असेल जाऊ द्या आणि शहराचा विकास जनतेच्या समोरच आहे. या कामांचेही कुणाला श्रेय घ्यायचे असेल तर ते घेऊ द्या. मला त्या वादात पडायचे नाही. यापुर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आमदारकी तर, उद्धव ठाकरे यांनी पक्षात मोठे पद देण्याबाबत विचारणा केली होती. पण, शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे सांगत या संधी नाकारल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. आईच्या हातचे जेवण चविष्ट लागते कारण ती आपली आई असते. दुसऱ्याने चांदीच्या ताटात जेवायला दिले तरी त्याला आईच्या हाताने मिळणाऱ्या जेवणाची चव येत नाही, असा टोलाही फुटीर नगरसेवकांना लगावला.

हेही वाचा >>>ठाणे: शेतकऱ्यांना मिळतोय ‘ सिंचन विहिरीचा ‘ आधार; सिंचन विहिरींच्या उभारणीकरिता जिल्ह्यात ४ कोटींचे आर्थिक सहाय्य

नजीब मुल्ला हे पक्षातच राहणार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी कुठेही प्रतिक्रीया दिलेली नसतानाही त्यांना बदनाम करण्याचे काम सुरु आहे. मुल्ला हे पक्ष सोडणार नाहीत, हे मी सुरुवातीपासूनच सांगत आहे. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही मुल्ला पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले आहे. मुल्ला हे दिल्लीत बँकेच्या बैठकीला गेले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला मुल्ला हे उपस्थित नव्हते. बँकेच्या बैठकीमुळे पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे मुल्ला यांनी अजित पवार यांना फोनवरून कळविले होते. तसेच मुल्ला यांनी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 19:05 IST
Next Story
सततच्या जलवाहिन्या फुटीमुळे डोंबिवली एमआयडीसीत दूषित पाण्याचा पुरवठा