ठाण्यातील विवीयाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वत: आव्हाड यांनी या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या वर्तकनगर पोलिसा स्थानकाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त असून मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्थानकाबाहेर जमले आहेत. दरम्यान अटकेची कारवाईनंतर जितेंद्र आव्हाड यांनी फोनवरुन वृत्तवाहिन्यांशी बोलताना अप्रत्यक्षपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. ठाणे हा मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्येही अनेकदा आव्हाड आणि शिंदेंमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन असणारे मतभेद उघडपणे समोर आले होते.

नक्की वाचा: ‘हर हर महादेव’बद्दल नेमका आक्षेप काय? आव्हाड म्हणाले, “बाजीप्रभू छत्रपती शिवाजीमहाराजांशी लढायला गेले हे कुठे…”

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?
Hemant Godse
अस्वस्थ खासदार हेमंत गोडसे कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी, अन्याय होणार नसल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

दुपारच्या सुमारास विवीयाना मॉल ज्या वर्तकनगर पोलीस स्थानकाअंतर्गत येतो त्या पोलीस स्थानकामध्ये आव्हाड यांना बोलवण्यात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी ठाण्याचे डीसीपी पोहोचले आणि त्यांनी आव्हाड यांना अटक करण्यात येत असल्याची माहिती दिली. घडलेल्या घटनाक्रमाबद्दल आव्हाड यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला सविस्तर माहिती फोनवरुन दिली.

“मला पोलीस स्थानकात बोलवलं. नोटीस घ्यायला बोलवलं. त्यावेळेस मला मुंबईला जायचं असल्याने मीच येतो पोलीस स्थानकात नोटीस घ्यायला असं सांगितलं आणि इथं आलो. त्यानंतर मी इथं चहा पीत असतानाच डीसीपी राठोड आले. त्यांची हतबलता चेहऱ्यावर दिसत होती. त्यांनी मला तुम्हाला अटक करावी लागेल असं म्हणाले. हे पोलिसी कायदे आहेत,” असं आव्हाड यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> सुप्रिया सुळे शिवीगाळ प्रकरण: “तो नेमका कोणत्या धर्माचं…”; इस्लामचा उल्लेख करत आव्हाड अब्दुल सत्तारांवर संतापले

“या (हर हर महादेव) चित्रपटामधून छत्रपती शिवाजी माहाराजांबरोबरच मराठा समाजाची बदनामी झाली. त्यावर आक्षेप घेतल्याने कारवाई होत असेल तर मी महाराजांचा मोठा रक्षक, अभ्यासक आहे. हे सरकार मला रोखू शकत नाही यापासून हे महाराजांना बदनाम करणाऱ्यांचं आहे की रोखणाऱ्यांच? अनैतिहासिक इतिहास दाखव्यासाठी अटक होणार असेल तर मी जेलमध्ये जाईल. जामीन पण करणार नाही,” असंही आव्हाड म्हणाले.

नक्की वाचा >> ‘हर हर महादेव’ वादावर गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना…”

“पोव्हिजनल एफआयरमधील कलमं जामीनपात्र आहेत. अडकवण्यासाठी स्पेशल कलम शोधून आणलं आहे. कट केला आहे. सरकार कट करत आहे. पोलीस हतबल आहेत. पोलीस हे पोलीस राहिलेच नाहीत ठाण्यात. प्रत्येक पोलीस स्थानकाबाहेर बाळासाहेबांची शिवसेना अशा पाट्या लावणार आहेत. मला कोणी आदेश दिलेत माहिती नाही. पण जनतेला दोन मिनिटांमध्ये कळालं आहे मी कोणाबद्दल बोलतोय,” असं आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट उल्लख न करता म्हणाले.