राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपासून महेश अहिर प्रकरणी चर्चेत आहेत. ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्याविरोधात जितेंद्र आव्हाडांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर हे प्रकरण तापलं. परिणामी त्यांच्याकडा पदभार काढल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यानी केली. या पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाडांनी ठाणे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. ठाण्यात एक सुमीत बाबा तयार झाले असून त्यांच्या एका फोनसरशीर सगळी कामं झटक्यात होतात, असा दावा आव्हाडांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

गुरुवारी विधानसभेत जितेंद्र आव्हाडांनी ठाणे महापालिकेतील कारभारावर बोट ठेवलं. यासंदर्भात रात्री विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सुमीत नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केला. “आजकाल बाबा लोकांचा जमाना आहे. सुमीत नावाचा एक बाबा ठाण्यात तयार झाला आहे. या सुमीत बाबाची एवढी पकड आहे की ठाण्याचे पोलीस आयुक्त असो किंवा पालिका आयुक्त, याचे फोन गेले की काम असं झटक्यात होतं. अत्यंत वेगात होतं. ठाण्यातली रंगरंगोटी किळसवाणी झाली आहे. ती कुणी करायची, कशी करायची हे सुमीत बाबा ठरवणार. पार्किंग करताना सुमीत बाबानं सांगितलं की गाड्या सरळ लावल्या तर ठाण्याचा विकास चांगला होईल असं अंकगणित त्यानं मांडलं. त्यामुळे आता पोलिसांनी सरळ गाड्या लावण्याचा आदेश काढला आहे”, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
When Anand Mahindra finds his work challenging he watches this video
जेव्हा आनंद महिंद्रांना स्वत:चे काम ‘Challenging’ वाटते तेव्हा काय करतात? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा
pet dog save child from falling down the stairs
… म्हणून कुत्रा माणसाचा चांगला मित्र आहे, कुत्र्याने चिमुकलीला पायऱ्यांवरून पडताना वाचवले; पाहा VIDEO

“अधिवेशन संपल्या संपल्या…”

“सुमीत बाबानं सांगितलं अमक्याला अमुक काम द्यायचं की झालं. हा सुमीत बाबा हिरानंदानी रोडाजमधल्या सर्वात महागड्या इमारतीत राहातो. सहा बेडरुमचा फ्लॅट मिळालाय त्याला. हा कोण आहे सुमीत बाबा? मलाही त्याचा भक्त व्हायचंय. जर भक्तकल्याण इतकं जोरात चाललं असेल, तर आम्हीही का मागे राहावं. आम्ही तर ठाणेकर आहोत. सुमीत बाबांचा आशीर्वाद आम्हालाही मिळायला हवा. त्यामुळे अधिवेशन संपल्या संपल्या सुमीत बाबांचे मलाही आशीर्वाद मिळतात का? हे मी पाहणार आहे”, असा खोचक टोला आव्हाडांनी यावेळी लगावला.

“विरोधकांना मिळेल तिथे…”, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणे, “हेच त्यांचे धोरण दिसते!”

महेश अहिर प्रकरणावरून आयुक्तांना केलं लक्ष्य

“विधानपरिषदेत काल उदय सामंतांनी आश्वासन दिलं की महेश अहिर यांची दोन्ही पदं काढून घेतली आहे. पण आज त्यांच्या कॅबिनमध्ये महेश अहिर पुन्हा जाउन बसले होते. सभागृह चालू असताना सभागृहाची काही इज्जत आहे की नाही. मला आयुक्तांना विचारायचंय. तुम्ही बातम्या वाचल्या. उदय सामंतांनी निवेदन दिलं. मग कोण मोठं आहे? सभागृह मोठं आहे की हे महाशय? जे ५०० कोटींचा भ्रष्टाचार करून मोकळे झाले आहेत. आपल्या मैत्रीणीला १० फ्लॅट वाटून मोकळे झालेत. आमच्याकडे रंगोली नावाचं मोठं साडीचं दुकान आहे. त्याच्या मालकाला विस्थापितांमध्ये गाळे दिले आहेत”, असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.

“…तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन”, उदयनराजे भोसलेंचं चॅलेंज

“ही गंभीर प्रकरणं आहेत. ४५० कोटींचं फक्त रंगरंगोटीचं काम केलंय. ब्रिजखालून गेलात तर अंगावर येतो तो ब्रिज. कुठलाही रंग चालकाच्या डोळ्यांवर येता कामा नये असा सर्वोच्च न्यायालयाचा इंडियन रोड काँग्रेस नावाच्या याचिकेत निर्णय आहे. हे सगळे रंग डोळ्यांवर येणारे आहेत”, असंही आव्हाड म्हणाले.