scorecardresearch

“मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला असता तर…”, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

“माझ्या पाठीमागे कोण आहे, हे अख्खे ठाण्याला आणि…”, असेही आव्हाड यांनी म्हटलं.

“मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला असता तर…”, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
एकनाथ शिंदे जितेंद्र आव्हाड ( संग्रहित छायाचित्र )

एखादा माणूस ४ वर्षे माझा पाठलाग करतो. माझे नागडे फोटो टाकतो. परत कांगावा करायचा मला मारलं, मला मारलं. आम्हाला घरदार नाही का? माझा राज्यकर्त्यांना प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकल्यावर महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया उमटेल. मी मुख्यमंत्र्यांपेक्षा छोटा कार्यकर्त्या आहे. मलाही मानणारी ४ लोक आहेत. तुम्हाला मानणारी ४० कोटी असतील, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

अनंत करमुसे मारहाण प्रकरणात २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा राज्य सरकारच्या वतीने आपले म्हणणे मांडले आहे. याप्रकरणाची फेरचौकशी अथवा सीबीआय द्या, असे राज्य सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा : “अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, कारण…”, बाबा रामदेव यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

“हा गुन्हा घडून पावणे तीन वर्ष झाली. चार्जशीटही न्यायालयात दाखल झाली आहे. सरकारने उच्च न्यायालयात शपथपत्रावर लिहून दिलं आहे. निकाल जाहीर झाला आहे. अनंत करमुसेलेच्या याचिकेप्रमाणे चौकशी झाली. आता राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात म्हणावं लागेल की तपास झाला तो चुकीचा होता. अथवा त्यात काहीतरी त्रुटी राहिल्या होत्या. सरकार बदलतात मात्र पोलीस बदलत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी खोटं काम केलं, अस सर्वोच्च न्यायालयात म्हटलं गेलं, तर त्याचं दूरगामी परिणाम मला अडकवण्यासाठी होईल,” असे आव्हाड यांनी सांगितलं.

हेही वाचा : बाबा रामदेव यांचं महिलांबद्दल वादग्रस्त विधान : रुपाली पाटील संतापल्या; म्हणाल्या, “अमृता फडणवीसांनी सणकन…”

“सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी ७२ तासांतील दोन गुन्हांचा देखील उल्लेख केला. कारण, जितेंद्र आव्हाड गुंड आहे, हे दाखवण्यासाठी. होय शिवाजी महाराज यांच्यासाठी चित्रपट बंद करणारा मी गुंडच आहे. इतिहासाची विकृती होऊ देणार नाही, जो करेल त्याला भोगाव लागेल. पण, माझ्या वकिलांनी माहिती दिली की, राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयातील मतं हास्यास्पद होतं. स्वत: न्यायाधीश देखील हसले. माझ्या पाठीमागे कोण आहे, हे अख्खे ठाण्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे. मला ऐवढे गांभीर्याने घेतलं जातं, याचं कौतुक वाटते,” असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

“हर हर महादेव प्रकरणात बोलवून अटक करण्यात आली. राज्य सरकार आपल्या विरोधात आहे, म्हणल्यावर लढावे लागणार. गांधी नेहरुंना मानणारे लोक जेलला घाबरत नसतात. खून अथवा बलात्कार केला नाही ना?, त्यामुळे माहिती नाही माझ्या नशिबात काय लिहलं आहे,” असे सुद्धा आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 23:51 IST

संबंधित बातम्या