जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी मारहाण प्रकरण

ठाणे : समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांच्या समक्ष बेदम मारहाण केल्याचा आरोप करत अनंत करमुसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात अनंत यांच्याविरोधातही पोस्ट टाकल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वर्तकनगर पोलिसांनी अनंत यांच्या पत्नीला समजपत्र पाठवले आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक

घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी काही दिवसांपूर्वी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्या वेळी निवासस्थानी आव्हाड उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करसुमे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटकही केली आहे. तर, अनंत करमुसेंविरोधातही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनंत यांच्या पत्नीला आता पोलिसांनी चौकशीसाठी समजपत्र पाठविले आहे.

या समजपत्रात तपास प्रक्रियेत अडथळा होईल अशी कृती करू नये, अपराधाचा पुरावा नष्ट करू नये, तपासकामासाठी उपस्थित राहावे अशा सूचना दिलेल्या आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी हे समजपत्र पाठविण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.