ठाणे : येथील कोलशेत भागातील स्थानिकांच्या रोजगारासाठी शनिवारी ग्रामस्थानी काढलेल्या मोर्चामध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचे नेते सामील झाले होते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या या दोन्ही पक्षांचे नेते मोर्चात एकत्रितपणे दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून यानिमित्ताने शहरातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

कोलशेत भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अनेक वर्षांपूर्वी कंपन्यांकडून मातीमोल किंमतीत ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर या कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कंपन्या बंद करून बिल्डरांना नफा कमवून जागांची विक्री केली. या बिल्डरांकडून मोठमोठी संकुले आणि मॉल उभारले जात आहेत. परंतु या भागातील स्थानिक तरुण-तरुणींना रोजागार दिला जात नसून, गुंडांच्या टोळ्या तैनात करून दहशत पसरविली जात आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार नाकारला जात असल्याच्याविरोधात भूमिपूत्रांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून त्याविरोधात ग्रामस्थांनी संघटीत होऊन ओबेरॉय रियल्टीविरोधात गुरुवारी मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान बिल्डरच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्थानिक तरुण-तरुणींना रोजगार देण्याची मागणी करण्यात आली.

Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Protest by former BJP corporators due to inadequate water supply in Mumbai print news
पाण्यासाठी आता भाजपच्या माजी नगरसेवकांचेही आंदोलन; माहीम आणि मुलुंडमध्ये धरणे
trade stop due to the closure of the market committees in West varhad
अकोला: बाजार समित्या बंद! कोट्यवधींचे व्यवहार ठप्प…
Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
mla sada sarvankar effort to waive 26 rent of st space given to women self help group
आर्थिक संकटातील एसटीची आमदारांकडूनच लूट

हेही वाचा – डोंबिवलीत सागावमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण करणाऱ्या खासगी शिकवणी चालिकेविरुध्द गुन्हा

कोलशेतमधील स्थानिकांनी हा मोर्चा काढला असला तरी या मोर्चात भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते एकत्रितपणे सामील झाल्याचे चित्र दिसून आले. भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मनोहर डुंबरे, कविता पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे हेही उपस्थित होते. राज्याच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप, टीका आणि टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे असतानाच, या दोन्ही पक्षाचे नेते कोलशेतमधील स्थानिकांच्या रोजगारासाठी काढलेल्या मोर्चात एकत्रितपणे दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून यानिमित्ताने शहरातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या संदर्भात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हेही वाचा – टिटवाळ्याजवळील दहागावमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

कोलशेत भागातील स्थानिकांच्या रोजगारासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमच्या पक्षाचे नेते सामील झाले होते. तसेच काही स्थानिकांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना बोलविल्यामुळे तेही मोर्चात सामील झाले होते. त्यामुळे एकत्रित मोर्चा काढण्याचा प्रश्न येत नसून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा हा आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा असल्याने त्यात आम्ही सहभागी झालो होतो. – मनोहर डुंबरे, भाजपचे माजी नगरसेवक