ठाणे – कळवा रेल्वे रूळाखाली असलेल्या नाल्यामधील कचऱ्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले. परिणामी कर्जत कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने धावत होती.
कळवा येथील रेल्वे रूळाखाली असलेल्या नाल्यामध्ये शुक्रवारी ५ वाजताच्या सुमारास कचऱ्याला आग लागली. या आगीच्या धुराचे लोट सर्वत्र पसरले. परिणामी ऐन गर्दीच्यावेळी धुराचे लोट पसरत असल्यान
कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशीरा धावत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रेल्वे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. कचऱ्याला लागलेली आग रेल्वे पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

