कल्याण : प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीच्या १८ पैकी १५ सदस्यांनी विजय प्राप्त करून बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक, अपक्ष दोन उमेदवार निवडून आले आहेत. मागील दोन महिन्यांपासून या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कोणत्याही परिस्थितीत कल्याण बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार व्यूहरचना केली होती. त्याप्रमाणे आपल्या प्रतिस्पर्धांना घरी बसवून महायुतीच्या उमेदवारांंनी अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत यश संपादन करून बाजार समितीत शिरकाव केला. रविवारी बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळी मतमोजणी झाली.

सर्वसाधारण गटातून जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, कपील थळे, भरत गोंधळी, योगेश धुमाळ, अरूण पाटील, जालिंदर पाटील, मनोरमा पाटील विजयी झाले. महिला गटातून विद्या अरूण पाटील, शारदा हरिश्चंद्र पाटील विजयी झाले. इतर मागासवर्गिय गटातून वसंत लोणे,, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून रवींद्र आव्हाड विजयी झाले. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, ग्रामपंचायत गटातून किशोर वाडेकर, आर्थिक दुर्बल गटातून विजय सुरोशी विजयी झाले. व्यापारी गटातून काशिनाथ नरवडे, गिरीश पाटील विजयी झाले. सर्वसाधारण कृषी, महिला गट, इतर मागास वर्ग, माथाडी, व्यापारी अडते, अनुसुचित जाती, ग्रामपंचायत, व्यापारी अशा विविध गटातून एकूण ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामधील १८ उमेदवार विजयी झाले.

कृषी बहुद्देशीय संस्थेच्या २४४ सदस्यांनी यावेळी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशाल जाधवर यांनी काम पाहिले. बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील, मधुकर मोहपे, शाहित मुल्ला, मोहन नाईक, भूषण जाधव पराभूत झाले. काही पराभूतांना दोन वर्षापूर्वी आमदार कथोरे यांच्या बरोबर केलेल्या कुरघोडीचा फटका बसला असल्याची चर्चा बाजार समितीत आहे. बाजार समितीची एकूण उलाढाल सुमारे ११० कोटीची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजार समितीची निवडणूक शांतात पार पडली. २० सहकारी संस्थांच्या २४४ मतदारांनी मतदान केले. ३६ ग्रामपंचायतींमधून ३३१, व्यापारी अडते गटातील १७८३ मतदारांपैकी चौदाशे मतदारांनी मतदान केले. बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.