Kalyan Badlapur Titwala Power Cut: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बडोदे ते मुंबई महामार्गाच्या कामासाठी महापारेषणची १०० केव्ही पडघा-मोहने उच्च वीज दाबाची वाहिनी शुक्रवारी (ता. १४) सकाळी ६ ते सकाळी ११ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण, टिटवाळा, बदलापूर शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा या कालावधीत विभागवार पद्धतीने बंद ठेवण्यात येईल अशी माहिती महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली आहे.
बडोदे ते मुंबई या कामासाठी महापारेषणची १०० केव्ही पडघा मोहने उच्च दाब वीज वाहिनीचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे महापारेषणच्या १००-२२ केव्ही मोहने व अंबरनाथ अति उच्चदाब उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणाऱ्या कल्याण, टिटवाळा, बदलापूर भागातील अनेक विभागांचा वीज पुरवठा बंद राहील.
टिटवाळा, बल्याणी, मांडा, आंबिवली परिसराचा वीज पुरवठा सकाळी ६ ते सकाळी ९ बंद राहणार आहे. शहाड गावठाण, शहाड फाटक, धोबी घाट, साई वर्ल्ड भागाचा वीज पुरवठा सकाळी ९ ते सकाळी ११, गोल मैदान, भीम नगर, मुकुंद नगर, साधु वासवानी नगर, डी. एड. काॅलेज परिसराचा वीज पुरवठा सकाळी ९ ते ११, शहाड बंदरपाडा, प्रेम ऑटो, योगीधाम, गौरीपाडा, अनुपम नगर, घोलप नगर, बिर्ला महाविद्यालय, इंंदिरा नगर, म्हाडा काॅलनी, कोकण वसाहत, संदीप हाॅटेल भागाचा वीज पुरवठा सकाळी ६ ते ११, खडकपाडा, साई चौक, माधव संकल्प, बारावे गाव, टावरी पाडा, बारावे पालिका पम्प गृह सकाळी ६ ते ११, चिकनघर, छोटा म्हसोबा, छाया टाॅकिज, रामबाग गल्ली, जोशी बाग, मुरबाड रस्ता, रेल्वे वसाहत, रेल्वे रुग्णालय, रुक्मिणीबाई रुग्णालय, कर्णिक रस्ता, पौर्णिमा चौक परिसर सकाळी ६ ते ११, वडवळी, अटाळी, आंबिवली, मांडा, नेपच्यून वसाहत सकाळी ६ ते ११, पालिका अटाळी पंप सकाळी ६ ते ११, मोहने यादवनगर, फुलेनगर, गाळेगाव, जेतवन नगर, तिपन्ना नगर सकाळी ६ ते ९,कात्रपगाव, चिखलोली, जांभुळ, दत्त नगर, कात्रप, कात्रपपाडा सकाळी ६ ते ९, खरवई, जुवेली गाव सकाळी ६ ते ९, मानकवली गाव, करवला सकाळी ६ ते सकाळी ९, बापसई, रायता, मिरचीवाडी, गोवेली सकाळी ६ ते ९, अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसर, कानसई, साई सेक्शन, मोहन पुरम सकाळी ९ ते ११, चिंचपाडा, कोहजगाव, नाना पाटील प्राईड सकाळी ९ ते ११.
—
