एका कंपनीत कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगाराचे त्याच कंपनीच्या मालकाच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध होते. आपल्या प्रेयसीचे अन्य कोणाबरोबर प्रेमसंबंध आहेत, असा संशय कामगाराला आला. प्रेयसी आपल्यावर खोटे प्रेम करते असा संशय घेऊन प्रेयसीचा निर्घृण करणाऱ्या अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका कामगाराला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी जन्मठेप आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मनोरंजन उर्फ राखाल सिध्देश्वर महाकुड असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे डोंबिवलीतील ॲड. सचिन कुलकर्णी यांनी प्रभावी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू, साक्षी पुरावे तपासून आरोपीला शिक्षा ठोठावली.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

जन्मठेप झालेला कामगार अंबरनाथ मधील एका कंपनीत काम करत होता. या कंपनी मालकाच्या अंबरनाथमधील घरासमोर कामगार राहत होता. काही कामानिमित्त कामगाराची मालकाच्या घरी येजा असे. या ओळखीतून कंपनी मालक आणि त्याची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.

सहा वर्षापूर्वी होळीच्या दिवशी कंपनी मालकाने घरासमोर त्याची पत्नी, त्यांच्या दोन मुलींसोबत होळी खेळण्याची तयारी केली. होळीसाठी रंग, पिचकाऱ्या आणल्या. कंपनी मालकाच्या पत्नीने तब्येत ठिक नसल्याने आपण होळी खेळणार नाही, असे पतीला सांगितले. वडिल आणि दोन मुली घराबाहेर होळी खेळत होत्या. घराबाहेर होळी खेळून झाल्यानंतर कंपनी मालक अंबरनाथमध्ये राहत असलेल्या आपल्या मेव्हण्याच्या घरी(मुलींचा मामा) दोन्ही मुलींना घेऊन होळी खेळण्यासाठी गेले. मामाच्या घरी रंगोत्सव करून कंपनी मालक आपल्या दोन्ही मुलींसह घरी आला. त्यावेळी त्यांना धक्का बसला.

घरामध्ये पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दोन्ही मुलींनी आकांत केला. मुलीचा मामा घटनास्थळी आला. त्यांनी तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. याप्रकरणी कंपनी मालकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला.

कंपनी मालकाच्या घरासमोर राहत असलेला कामगार मनोरंजन महाकुड घरात नसल्याचे आणि तो उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल असल्याची माहिती कंपनी मालक आणि पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कामगार मनोरंजनची चौकशी केली. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार होते. मनोरंजनने रुग्णालयात दाखल होताना आपल्या मित्राजवळ ‘मी त्या बाईला मारले आणि त्या बाईने प्रतिकार करताना मला जखमी केले’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मनोरंजनची कसून चौकशी केली. त्याने कंपनी मालकाच्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

कंपनी मालकाची पत्नी आणि आपले प्रेमसंबंध होते. होळीच्या दिवशी कंपनी मालक, त्याच्या दोन्ही मुली मामाकडे होळी खेळण्यासाठी गेल्या. त्यावेळी मनोरंजन मालकाच्या पत्नीच्या घरी गेला. त्यावेळी त्या महिलेला अन्य कोणा व्यक्तीचा फोन आला. त्याचा मनोरंजनला संशय आला. त्या रागात त्याने कंपनी मालकाच्या पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरला. महिलेने प्रतिकार करताना मनोरंजनवर पण वार केले, अशी माहिती सरकारी वकील ॲ्ड. सचिन कुलकर्णी यांनी दिली.

मनोरंजनने खून केल्याचे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा खटला सुनावणीला आल्यानंतर न्यायालयाने दहा दिवसात या प्रकरणात निर्णय दिला.