कल्याण : एकदा काळोखा पडायला लागला की कल्याण, डोंबिवली शहरातील मोकळ्या जागा, झाडे झुडपे, खाडी किनारे, उड्डाणपूल ठराविक अड्डे मद्यपी, गांजा सेवन करणारे, गुन्हेगार यांनी ओसंडून व्हायचे. रात्री उशिरापर्यंत हे अड्डे आरडाओरडा, शांततेचा भंग करत सुरू असायचे. मागील चार वर्ष हा त्रास नागरिकांनी सहन केला. आता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण पोलीस परिमंडळाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी शहरातील गैरकृत्यांविरुध्द दणके, फटके आणि झोडपशाही सुरू केल्यापासून अनेक वर्ष अस्वस्थ असलेली कल्याण, डोंबिवली आता शांत झाली आहे.

रात्री उशिरापर्यंत कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात स्थानिक यंत्रणा, राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने चायनिज हातगाड्या, ढाबे, मद्य, गांजा, अंमली पदार्थ विक्री आणि तस्करीचे अड्डे खुले आम चालायचे. स्थानिक पोलिसांवर वरिष्ठांचे नियंत्रण राहिले नव्हते. या बजबजपुरीमध्ये सामान्य कल्याण, डोंबिवलीकर मात्र खूप अस्वस्थ होता. चार वर्षात माजी पोलीस उपायुक्तांनी दिवसा, रात्रीच्या गैरकृत्यांविरुध्द कधी आक्रमक भूमिका घेतल्याचे नागरिकांना दिसले नाही.

lokmanas
लोकमानस: महागड्या गृहसंकुलांतही तेच…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
Loksatta anvyarth Is there a sign of India China relations
अन्वयार्थ: भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणांचे संकेत?
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
second phase of action against unauthorized buildings at Agrawal Nagar in Nalasopara also underway on Monday
नालासोपार्‍यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई, स्थानिकांच्या रोषाचा खासदार, आमदारांना फटका

आणखी वाचा-डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील उदवहन तीन दिवसांपासून बंद, उदवहनला वाहनांचा वेढा

कल्याण, डोंबिवलीत वाढती गुन्हेगारी, गैरकृत्ये, लैंगिक अत्याचार, हाणामाऱ्या, चाकू, सुरे हल्ले हे प्रकार खूप वाढले होते. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गेल्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिले स्थानिक पोलीस ठाण्यांना आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गैरधंदे, गैरकृत्य बंद करण्याचे आदेश दिले.

शहराच्या विविध भागात दिवसा, रात्री रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर व्यवसाय करणारे, चायनिज, ढाबे चालविणाऱ्यांवर जोरदार कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. उपायुक्त अतुल झेंडे अचानक शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळेत फेरफटका मारून कुठे गैरकृत्य सुरू आहेत का याचा स्वता अंदाज घेत आहेत. उपायुक्त झेंडे यांनी स्वता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन तेथे मद्य, गांजा, चायनिज, ढाब्यांवर मिळालेल्या सुमारे ७०० हूुन अधिक मद्यपी, गांजा सेवकांना चांगलीच अद्दल घडवली. त्यांना लाठीच्या माध्यमातून पोलिसी खाक्या दाखविला. हे प्रकार समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने मद्यपी, अंमली पदार्थ सेवक, गैरधंदे करणाऱ्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. रात्रीची आडोशाची तर्र, मद्यधुंद कल्याण, डोंबिवली आता शांत शांत झाली आहे.

आणखी वाचा-शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बँक अधिकाऱ्याचीच ऑनलाईन फसवणूक

दिवस, रात्र असो शहरात कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. प्रत्येक नागरिकाला आपली कर्तव्य विनाअडथळा करता आली पाहिजेत. गैरकृत्य होता कामा नयेत, गैरधंदे दिसता कामा नयेत. याचा कोणताही त्रास नागरिकांना होता कामा नये. या गैरप्रकारांविरुध्द मोहीम सुरू आहे. आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य, गैरधंदे करणाऱ्या ७०० हून अधिक जणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. -अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, कल्याण.

Story img Loader