scorecardresearch

Premium

आयुक्तांच्या अचानक पाहणी दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ; रस्ते, स्वच्छता, आरोग्य, फेरीवाले, बेकायदा बांधकामांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत

कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्याच्या १० दिवसांच्या कालावधीत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी विविध विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.

kalyan dombivli municipal commissioner ias dr indurani jakhar
आयुक्तांच्या अचानक पाहणी दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ; रस्ते, स्वच्छता, आरोग्य, फेरीवाले, बेकायदा बांधकामांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्याच्या १० दिवसांच्या कालावधीत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी विविध विकास कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. पालिका हद्दीतील विकास प्रकल्प, पालिकेच्या नागरी सुविधांची पाहणी त्या कोणत्याही पू्र्वसूचनेविना करत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ होत आहे. सुट्टीच्या दिवशीही आयुक्त जाखड कार्यालयात उपस्थित राहत असल्याने विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

मागील तीन वर्षापू्वी थेट आय. ए. एस. आयुक्त ई. रवींद्रन, पी. वेलरासू यांनी प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या बदल्यानंतर प्रशासनात पुन्हा सुस्तपणा आणि अधिकारी, कर्मचारी सुशेगात होते. गेल्या दीड वर्षाच्या काळात कधी नव्हे एवढे प्रशासन सुस्तावले होते. थेट भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय. ए. एस.) आयुक्त डाॅ. जाखड पालिकेत हजर झाल्यापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त दिसू लागली आहे. स्वत: आयुक्त पावणे दहा वाजता हजर होतात. यापूर्वी अधिकारी पहाणी दौऱ्याच्या नावाखाली दुपारी बारा वाजता कार्यालयात येऊन रात्री नऊ वाजेपर्यंत कार्यालयात कामे करत बसत होते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नव्हती. जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून आपल्या कठोर शिस्तीची चुणूक पहिल्या १० दिवसात दाखवून दिली आहे. सुशेगात कर्मचारी वर्ग आता सकाळी कार्यालयीन वेळ सुरू होण्याच्या अगोदरच कार्यालयात हजर असतो.

meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष
farmers agitation causes massive traffic jam in nashik city
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Future of redevelopment of 38 MHADA buildings of backward classes uncertain
मुंबई : मागासवर्गीयांच्या ३८ म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाचे भवितव्य अधांतरी! मालकी हक्क असूनही अडचण

हेही वाचा : अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान; मळणी केलेला भात अन् रब्बी हंगामातील लागवड धोक्यात

आढाव बैठकीत अस्वस्थता

रस्ते, स्मार्ट सिटी प्रकल्प, सुरू असलेले विकास प्रकल्प यांची माहिती आयुक्त जाखड या विभागप्रमुखांकडून ऐकून घेतात. या माहितीत काही त्रृटी, चुकीची माहिती मिळत असल्याचे समजले तर मात्र स्ंबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेतात. आयुक्त जाखड यांच्याकडून आढावा बैठकीत कोणत्या क्षणी काही प्रश्न येईल, या भीतीने बैठकी पुर्वीच्या तयारीला कधी नव्हे अधिकारी लागले असल्याचे पालिकेत चित्र आहे.

हेही वाचा : ‘आनंद दिघे साहेबांचा हंटर कुठेय’, मुख्यमंत्र्यांनी विचारले निर्मात्यांना, जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत मुख्यमंत्र्यांसह सगळेच झाले रममाण

सोमवारी सुट्टी असुनही आयुक्तांनी अचानक डोंबिवलीत पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात फेरी मारली. रुग्णालयात त्यांनी विविध विभागांची, रुग्ण सेवेची माहिती घेतली. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे साहाय्यक आयुक्तांना आदेश आहेत.

“अनेक वर्षानंतर शिस्तप्रिय थेट आय. ए. एस. महिला अधिकारी कल्याण डोंंबिवली पालिकेला लाभली आहे. राजकीय मंडळींनी हस्तक्षेप न करता त्यांना विकास कामे मार्गी लावण्यासाठी, शहरांचे बकालपण घालविण्यासाठी मोकळीक द्यावी. किमान तीन वर्ष डाॅ. इंदुराणी जाखड पालिकेत राहतील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न करावेत.” – लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरी महिला रेल्वे प्रवासी महासंघ, डोंबिवली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kalyan dombivli municipal corporation commissioner ias dr indurani jakhar inspecting public facilities css

First published on: 28-11-2023 at 14:46 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×