ठाकुर्लीतील चोळे गावात विठाई गॅलेक्सी आणि मंगल कलश सोसायटीच्या बाजुला कल्याण डोंबिवली पालिकेचे सुसज्ज डायलिसिस केंद्र रुग्ण सेवेसाठी सज्ज झाले आहे. हे केंद्र लवकर सुरू करुन लाभार्थींना या केंद्राचा लाभ मिळून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावरील जिना बंद केल्याने प्रवाशांचे हाल

कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे शहराच्या विविध भागात डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येत आहेत. रहिवाशांना स्थानिक भागातच डायलिसिसची सुविधा मिळावी हा या उपक्रमा मागील पालिकेचा उद्देश आहे. डायलिसिस सेवा घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ही सेवा नियमित घेणे अनेक रुग्णांना आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाही. त्यामुळे रास्त, मोफत ही सुविधा कोठे मिळते का याचा तपास रुग्ण, नातेवाईक करत असतात. रुग्णांची ही अडचण विचारात घेऊन ठाकुर्ली चोळेगावातील डायलिसिस केंद्र लवकर सुरू करावे, अशी मागणी जिल्हाप्रमुख थरवळ यांनी प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये इमारतीत शिरला बिबट्या, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

हे केंद्र सुरू व्हावे म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून आपण पाठपुरावा करत होतो. खाटा, यंत्रणा येणे बाकी असल्याने हे केंद्र सुरू करण्यात येत नसल्याची माहिती पालिकेकडून दिली जात होती. आता या केंद्रात खाटा, डायलिसिस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे हे केंद्र लवकर सुरू करावे म्हणजे डोंबिवली, २७ गाव, ठाकुर्ली परिसरातील रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येईल, असे जिल्हाप्रमुख थरवळ यांनी सांगितले.याविषयी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. अश्विनी पाटील यांनी सांगितले, या केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध असल्या तरी या केंद्रातून रुग्णांना मोफत उपचार केले जातात. यासाठी या केंद्राला शासनाच्या महाराष्ट्र फुले जनआरोग्य विभागाची मान्यता घ्यावी लागती. या मान्यतेसाठी पालिकेने विभागाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. ही परवानगी लवकर मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. ही मान्यता मिळाल्याशिवायी रुग्णांना या केंद्रात मोफत उपचार देता येत नाहीत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मान्यता मिळाली की तातडीने हे केंद्र सुरू केले जाणार आहे.

हेही वाचा >>>भिवंडी ते इमारतीत बांधकामाचे उद्वाहक कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

“ ठाकुर्ली चोळे गावातील डायलिसिस केंद्र सुविधांनी युक्त केले आहे. या केंद्राला महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मंजुरी मिळाली की तातडीने हे केंद्र सुरू केले जाणार आहे. मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे.”- डाॅ. अश्विनी पाटील,वैद्यकीय आरोग्य अधिकारी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipal corporation dialysis center at thakurli chole village amy
First published on: 24-11-2022 at 13:56 IST