कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्ती उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने घेतला आहे. मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उत्पादनावर भर द्यावा आणि भाविकांनी अशा मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पालिका हद्दीत गणेश मूर्तींचे उत्पादन, विक्री करण्यासाठी मूर्तिकार, कारागिर, विक्रेत्यांनी पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जे मूर्तिकार, विक्रेते, कारागिर पालिकेकडे नोंदणी करणार नाहीत, त्यांना पालिका हद्दीत मूर्ती विकण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

Dombivli illegal chawls demolished
डोंबिवलीत बेकायदा चाळींवर कारवाई
Dombivli, Dombivli Developers accused to defraud 14 home buyers, Defrauding 14 Home Buyers of Over Rs 1 Crore, Housing Scam, Dombivli news,
डोंबिवलीतील विकासकांकडून घर खरेदीदारांची एक कोटीची फसवणूक
kalyan shivsena new appointment
कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका, सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी
Kalyan Dombivli Municipality, Dangerous Building, kdmc Action Against Landlady of Dangerous Building, kalyan news,
कल्याणमध्ये अतिधोकादायक इमारतीच्या घरमालकीणीवर गुन्हा, कल्याण डोंबिवली पालिकेकडून प्रथमच आक्रमक कारवाई
Dawood brother, iqbal kaskar,
दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याची निर्दोष सुटका
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Vidyaniketan school in Dombivali was closed for the afternoon session due to Heavy traffic
वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतल्या विद्यानिकेतन शाळेला दुपारच्या सत्रात सुट्टी, राजू पाटील म्हणाले, “ही बाब लज्जास्पद”
Regency Anantam Water Cut Issue
डोंबिवलीतील हाय प्रोफाईल गृहसंकुल प्रकल्पात पाण्याचा खडखडाट, घरं खरेदी केलेल्या लोकांची निराशा

हेही वाचा…अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निविदा, ४३० खाटांच्या रुग्णालयाचीही उभारणी होणार

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० च्या सुधारित नवीन मार्गदर्शक कायद्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उत्पादनांवर बंदी घातली आहे. त्याचे काटेकोर पालन कल्याण डोंबिवली पालिकेकडून केले जाणार आहे. मूर्तिकार, उत्पादक, कारागिर, विक्रेते यांना मूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू करणे, मूर्ती विक्रीसाठी मंच लावणे यासाठी परवानगी देण्यासाठी पालिका प्रभाग कार्यालयांमध्ये नियोजन केले जाणार आहे. जे अशाप्रकारची परवानगी घेणार नाहीत, त्यांच्यावर पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी कारवाई करतील, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी स्पष्ट केले आहे.

पालिका परवानगीची प्रत प्रत्येक मूर्तिकार, कलाकार, विक्रेत्यांनी कारखाना, दुकानाच्या दर्शनी भागात लावावी. पर्यावरणपूरक, शाडू मातीच्या, नैसर्गिक रंग वापरून सहज पाण्यात विरघळणाऱ्या मूर्ती तयार करण्यावर मूर्तिकारांना भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. जे या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिला आहे.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ‘सुपरमॅक्स’ कामगारांचा ठिय्या ; एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

मूर्तिकार बैठक

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उत्पादनावर भर देण्यात यावा. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) वापरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची असलेली बंदी, तसेच पीओपीच्या वापराचे दुष्परिणाम याविषयावर मूर्तिकार, कारखानदार, विक्रेते यांच्याशी चर्चा करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शुक्रवार, १४ जून रोजी,दुपारी चार वाजता अत्रे रंगमंदिरातील सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले आहे.