कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेतील नगररचना विभागात इमारत बांधकाम आराखडे आणि इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिक, विकासक, वास्तुविशारद यांना बसण्यासाठी सुस्थितीत दालन असावे म्हणून प्रशासनाने अभ्यंगतांसाठी सुसज्ज दालनाचा शोध सुरू केला आहे. हा दालन शोध घेताना पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांच्या दालनावर नजरा वळविल्याने संबंधित अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर काढला जात आहे.

पालिकेतील सर्वात मोठे दालन नगररचना अधिकाऱ्यांसाठी आहे. या दालनातील काही जागा अभ्यंगतांसाठी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी राखून ठेवावी. नगररचना विभागाप्रमाणे इतर अधिकाऱ्यांकडेही नागरिक येत असतात. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांच्या दालनांवर नगररचना अधिकाऱ्यांचा डोळा कशासाठी, असे प्रश्न दालन जाणाऱ्या अधिकाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

हेही वाचा >>> नागपूर : कुठल्या जिल्ह्यात किती वाळू उपलब्ध ते जाणून घ्या!, विदर्भात सर्वाधिक साठा या जिल्ह्यात

‘एमसीएचआय’च्या कल्याण मधील फडके मैदानावरील गृहप्रकल्प प्रदर्शन उद्घाटनाच्यावेळी विकासक, वास्तुविशारदांनी नगररचना विभागात नियमित कामे घेऊन येणाऱ्या अभ्यंगतांना बसण्यासाठी चांगले दालन असावे अशी मागणी ‘एमसीएचआय’ सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासमोर केली होती. आयुक्तांनी ही गैरसोय दूर करण्याचे आश्वासन विकासक, वास्तुविशारदांना दिले होते. अशाप्रकारचे दालन उपलब्ध व्हावे म्हणून वास्तुविशारद संदीप पाटील यांनी आयुक्तांच्या मागे तगादा लावला आहे. आयुक्तांनी नगररचना विभागाजवळ असलेल्या कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, साहाय्यक आयुक्त स्नेह करपे यांच्या दालनाची पाहणी केली.

हेही वाचा >>> गौरवास्पद! जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची कलाकृती अमेरिकेत झळकणार; ‘या’ लघुचित्रपटाची जागतिक महोत्सवासाठी निवड

नगररचना अधिकाऱ्यांनी ही दालने नगररचना कार्यालयाजवळ असल्याने या दालनांना ‘पसंती’ दिली आहे. नागरी सुविधा केंद्राजवळ अभ्यंगतांसाठी जागा असताना अधिकाऱ्यांच्या दालनावर नगररचना विभागाचा डोळा कशासाठी असे प्रश्न अधिकारी करत आहेत. नगररचना कार्यालयाजवळील एका दालनात ज्येष्ठ कार्यकारी अभियंता नवांगुळ, एका दालनात शासन सेवेतील प्रतिनियुक्तीवरील साहाय्यक आयुक्त करपे यांचे प्रशासकीय कामकाज चालते. पालिकेत दोन वर्षापूर्वी आल्यावर स्नेहा करपे यांना काही महिने दालन नव्हते. इतर महिला अधिकाऱ्यांच्या दालनात बसून त्या कामकाज करत होत्या. मोठ्या मुश्किलीने त्यांना आयुक्त दालन असलेल्या मजल्यावर एक कार्यालय उपलब्ध झाले तर ते दालन आपणास पाहिजे म्हणून प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा अडून बसले होते, असे समजते.

हेही वाचा >>> वर्धा : एमआयडीसीत लागलेल्या आगीच्या ज्वाळा अद्याप धुमसत्या; कोट्यवधीची हानी, फायर स्टेशन नसल्याबद्दल खासदारांचा संताप

दोन कार्यालये बदलून झाल्यावर मोठ्या मुश्किलीने नगररचना दालनाच्या बाजुला एका कार्यालय साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांना अलीकडे उपलब्ध झाले. परिमंडळ एक साहाय्यक आयुक्त इतर प्रशासकीय पदभार त्यांच्याकडे आहेत. नागरिक विविध कामे, तक्रारी घेऊन येत असतात. आता नवांगुळ किंवा करपे यांचे दालन अभ्यंगतांसाठी उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्याने संबंधित अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. सातत्याने आपल्याच दालनावर गदा येत असल्याने करपे यांनी समपदस्थ अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे कळते. इतरांप्रमाणे प्रशासकीय कामकाज आपल्याही दालनातून चालते. आता दालन सोडणार नसल्याचे करपे यांनी समपदस्थांना सांगितल्याचे कळते. शासन सेवेतील अधिकारी पालिकेत येत आहेत. अशा परिस्थितीत दालने नसतील तर प्रशासन त्यांची मागणी करतेच कशाला, असा प्रश्न माहिती कार्यकर्ते सुरेश तेलवणे यांनी केला. नवांगुळे, करपे यांना संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.