कल्याण : कल्याण शहराच्या सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या इंडीयन मेडीकल असोसिएशन, कल्याण शाखेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कल्याणमधील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजेश राघव राजू यांची अध्यक्षपदी, तर सचिवपदी डॉ. हिमांशु ठक्कर आणि खजिनदारपदी डॉ. स्वाती शेलार यांची निवड करण्यात आली. डाॅ. राजू या संघटनेचे ४६ वे अध्यक्ष आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ आणि मुंबई ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गौतम जव्हेरी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कल्याणातील आयएमए हॉलमध्ये हा दिमाखदार पदग्रहण सोहळा पार पडला.

आयएमए कल्याण शाखेची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष – डॉ. राजेश राघव राजू, सचिव – डॉ. हिमांशु ठक्कर खजिनदार – डॉ. स्वाती शेलार, प्रेसिडेंट इलेक्ट – डॉ. विकास सुरांजे, सहसचिव – डॉ. अमित धर्माधिकारी, विश्वस्त मंडळात -डॉ. नरेंद्र पाठक, डॉ. प्रदीपकुमार सांगले, डॉ. राजन माने यांचा समावेश आहे. व्यवस्थापकीय समितीत डॉ. कविता तोडकर, डॉ. कुलदीपक शिंदे, डॉ. लीना सानेकर, डॉ. मनोज पाटील, डॉ. राहुल तिवारी, डॉ. रुपाली धोपटे, स्टेट कौन्सिल मेंबर्स – डॉ. अमित बोटकोंडे, डॉ. गणेश शिरसाठ, डॉ. प्रशांत सी. खाताळे, डॉ. प्रशांत पी. पाटील, डॉ. शशांक डी. पाटील, डॉ. दीपक राठोड, डॉ. प्रविण भुजबळ, डॉ. प्रदीपकुमार सांगले, डॉ. राजन माने, डॉ. विवेक भोसले, वेब संपादक मंडळात डॉ.अमित झोपे, डॉ. प्रतीक्षा रसाळ यांचा समावेश आहे.

वाढत्या नैसर्गिक आपत्ती-अपघाताच्या घटना पाहता इंडियन मेडीकल असोसिएशनने महापालिकेच्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपत्ती काळातील आरोग्यसेवेच्या मानक कार्यप्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आयुक्त गोयल यांनी व्यक्त केली. डॉ. गौतम जव्हेरी यांनी सांगितले, की एआय आले तरी डॉक्टरांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. एआय हे तंत्रज्ञान केवळ आजारावर – रोगावर इलाज करत. डॉक्टर हे रुग्णाला समजून घेऊन त्याच्यावर उपचार करतात.

‘आयएमए कल्याण शाखेला सामाजिक कार्याची एक मोठी परंपरा लाभली आहे. येत्या काळामध्ये कल्याणातील नागरिकांसाठी सर्वोपचारी नामांकित हॉस्पिटलच्या सहाय्याने महाआरोग्य शिबिर घेण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू यांनी व्यक्त केला. यावेळी आयएमए कल्याणच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, कल्याण डोंबिवली पालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, उद्यान अधीक्षक संजय जाधव उपस्थित होते.