ठाणे : कल्याण तालुक्यातील म्हस्कळ गावात गेल्या अनेक महिन्यांपासून इलाइट नशामुक्ती केंद्र नावाने अनधिकृत नशामुक्ती केंद्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी येणाऱ्या रुग्णांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडून प्रतिमहिना हजारो रुपयेदेखील वसूल केले जात असल्याचे समजते आहे. या ठिकाणी ठाण्याहून दारू सोडविण्यासाठी आलेल्या एका २४ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कल्याण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी गंभीर मारहाण आणि प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नशामुक्ती केंद्रातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सविस्तर तपास सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in